Pimpalwandi Girl Assault Murder Case Pune Police traces Accuse via CCTV Crime News; सायकलवरुन जाणारा कोण आहे? पोलिसांचा सवाल; साहेब हा तर मीच आहे, आरोपीचं उत्तर, पुण्यातील चिमुकलीवर अत्याचार करणारा अलगद सापडला
Pimpalwandi Girl Assault Murder Case Pune Police traces Accuse via CCTV Crime News; सायकलवरुन जाणारा कोण आहे? पोलिसांचा सवाल; साहेब हा तर मीच आहे, आरोपीचं उत्तर, पुण्यातील चिमुकलीवर अत्याचार करणारा अलगद सापडला
Pune Girl Assault Murder : पीडित चिमुकली आजारी असल्यामुळे काही दिवस शाळेत जात नव्हती. या काळात ती घरी एकटीच असल्याचं आरोपीने हेरलं होतं. त्याचा गैरफायदा घेऊन वासनांध तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. ती शाळेत गेली असती; तर कदाचित तिचा जीव वाचला असता, अशी हळहळ आता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पिंपळवंडी येथील निर्भया आजारी होती. त्यामुळे ती काही दिवस शाळेत जात नव्हती. या काळात ती घरी एकटीच असल्याचे आरोपीने हेरले होते. त्याचा गैरफायदा घेऊन वासनांध आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. ती शाळेत गेली असती; तर कदाचित तिचा जीव वाचला असता, अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात होती.
ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात
मृत मुलगी चौथ्या इयत्तेमध्ये शिकत होती. तिचे आई-वडील शेतमजुरीसाठी जात. त्या वेळेत मुलगी शाळेत जात होती. त्यामुळे ती घरी एकटीच असल्याचा प्रसंग फारसा कधी ओढवला नव्हता; तसेच आरोपी त्यांच्या घरासमोरच राहत होता. त्यामुळे तो ओळखीचा होता. त्यामुळे तो काही गैरकृत्य करू शकतो, अशी शंकाही कधी पालकांच्या मनात आली नव्हती. मात्र, ओळखीच्या व्यक्तीनेच घात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गावकऱ्यांसोबत शोध मोहिमेत सहभागी
पिंपळवंडीत १८ ऑगस्टची रात्र अनेक कुटुंबांसाठी अस्वस्थतेची ठरली. साडेनऊ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थ शोधासाठी बाहेर पडले. या सगळ्या धावपळीत एक तरुणही गावकऱ्यांसोबत मुलीला शोधत होता. काही तासांनी मात्र पोलिसांच्या तपासातून याच तरुणाभोवती संशयाचे धागे घट्ट होत गेले.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. स्थानिक गुन्हे शाखेची पथके गावात दाखल झाली. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले जाऊ लागले. त्यातील एका दृश्यात सायकलवरून जाणारी व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आली. त्या व्यक्तीबाबत विचारणा केली असता संबंधित तरुणाने तो स्वतः असल्याचे सांगितले. मात्र, तपास जसजसा पुढे सरकला तसतसे त्याच्या हालचाली पोलिसांच्या नजरेत येऊ लागल्या. दरम्यान, मुलीच्या कुटुंबासाठी प्रत्येक क्षण आशेचा आणि भीतीचा होता. ती सुखरूप सापडेल, अशी अपेक्षा ठेवून गावकरी परिसरात शोध घेत होते. मात्र, रात्री ओढ्याच्या परिसरात पोलिसांना झाडाजवळ तिचा मृतदेह आढळला.
पोलिसांनी संशयित तरुणाची चौकशी केली. त्याच्या जबाबातील विसंगती तपासल्यानंतर त्याच्याकडे अधिक कसून चौकशी करण्यात आली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पिंपळवंडीतील वातावरण शोकाकुल झाले. काही तासांपूर्वी जिच्या सुरक्षित परतीची प्रतीक्षा केली जात होती, तीच मुलगी आता या जगात नसल्याचे वास्तव कुटुंबीयांसह ग्रामस्थांसमोर होते. परिचयाच्या व्यक्तीवर ठेवलेल्या विश्वासाचा असा अंत झाल्याने गावात संतापही व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा