गेल्या काही वर्षांपासून पेटीएम ॲप आणि पेटीएम पेमेंट्स बँकेने कामकाज वेगळे केले आहे, त्यामुळे या कारवाईचा परिणाम केवळ बँकिंग सेवांवर होईल आणि अख्ख्या पेटीएम ॲपवर नाही. यूपीआय, QR कोड पेमेंट्स, मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट्स आणि इतर डिजिटल पेमेंट सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
PPBL विरुद्ध रिझर्व्ह बँकेची कारवाई
आरबीआयने आधीच नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे PPBL चा परवाना रद्द केला होता आणि आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बँक बंद करण्याच्या प्रक्रियेतील अंतिम टप्प्यात असल्याचे मध्यवर्ती बँकेने सांगितले. 24 एप्रिल 2026 रोजी आरबीआयने बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 22(4) अंतर्गत सतत नियमांचे उल्लंघन आणि बँकेच्या ग्राहकांना असलेला धोका ही कारणे देत पीपीबीएलचा बँकिंग परवाना रद्द केला होता.
काय बंद होणार? काय सुरू राहणार?
पेटीएम पेमेंट्स बँक बंद होणे म्हणजे केवळ बँकिंग सेवा बंद होतील. तुम्ही UPI पेमेंटसाठी पेटीएम ॲप वापरत असाल, तर तुम्हाला कोणताही बदल किंवा काळजी करायची गरज नाही.
इकडे भारतात Share Market सुस्साट, चिनी कंपनीची धूम, तिकडे कोरियाचा KOSPI धारातीर्थ! आव्हाने पेलून IT स्टॉक्सची झेप
पेटीएम ॲपवरून UPI पेमेंट, QR कोड पेमेंट, मोबाईल रिचार्ज, वीज आणि पाणी बिल भरण्यासह इतर ऑनलाइन पेमेंट सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. याशिवाय पेटीएम साउंडबॉक्स, कार्ड मशीन, पेमेंट गेटवे, पेटीएम गोल्ड आणि पेटीएम मनी यांसारख्या सेवांवरही या निर्णयाचा परिणाम होणार नाही.
पेटीएम पेमेंटचे बँकेत पैसे जमा केले, त्यांचे काय?
त्याचवेळी, तुम्ही तुमचा पैसा पेटीएम पेमेंट्स बँकेत जमा केला असला तरीही तुम्ही घाबरायची गरज नाही. ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले जात असून एखाद्या ग्राहकाला अद्याप पैसे मिळाले नसतील, तर बँकेच्या कार्यपद्धतीनुसार परत केले जातील.
एखाद्या ग्राहकाचे पैसे पेटीएम पेमेंट्स बँकेत अडकून पडले असतील तर त्यांनी बँक खात्याची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट आणि KYC दस्तऐवज जपून ठेवावे. तसेच, लिक्विडेटर आणि आरबीआय यांनी जारी केलेल्या कोणत्याही सूचना व अंतिम मुदतींवर लक्ष ठेवावे लागेल.
UPI वापरकर्त्यांनी काय करावे?
तुमचा UPI दुसऱ्या बँक अकाउंटशी लिंक्ड असल्यास या निर्णयाचा तुमच्यावर परिणाम होणार नाही, पण तुमचे UPI अजूनही जुन्या किंवा निष्क्रिय Paytm Payments Bank खात्याशी लिंक्ड असल्यास त्वरित दुसऱ्या बँक खात्याशी जोडा. तसेच जुने Fastags किंवा walletsपेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडलेले आणि ज्यांचे कोणतेही प्रलंबित दावे आहेत, त्यांचेही या प्रक्रियेद्वारे निराकरण केले जाईल.
दुसरीकडे, पेटीएम पेमेंट्स बँक शेअर बाजारात सूचीबद्ध नाही, त्यामुळे या निर्णयाचा सामान्य गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होणार नाही. तसेच पेटीएमची मूळ कंपनी, वन97 कम्युनिकेशन्सने, बँकेतील आपली गुंतवणूक आधीच कमी केली आहे त्यामुळे, या निर्णयामुळे गुंतवणूकदारांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

