Headlines

Payal Jadhav Starar Jayanti 2 Film Trailer Out ; डोळ्यात उच्च शिक्षणाचं स्वप्न पण जातीमुळे पडली रॅगिंगला बळी! आगामी ‘जयंती 2’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर समोर


Jayanti 2 Trailer Out :कॉलेजमध्ये घडणारे अनुचित प्रकार, दलित मुलांना होणारा त्रास यांसारख्या गोष्टींवर प्रकाश टाकाणारा जयंती 2 सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच त्याचा ट्रेलर समोर आला आहे.

jayanti 2
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनेक कायदे, नियम असतानाही कॉलेजमध्ये रॅगिंग, भेदभावाच्या घटना घडतात. अनेकदा अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जातीमुळे रॅगिंग, छळ सारख्या त्रासाला तोंड द्यावे लागते. आता ‘जयंती २’ या चित्रपटातून कॉलेजमधील रॅगिंग, भेदभावाची गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, या चित्रपटातून या गंभीर विषयाला वाचा फुटणार आहे. हा चित्रपट येत्या 11 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल नावाच्या एका मुलीची गोष्ट ‘ जयंती 2 ‘ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचं स्वप्न पायलनं उराशी बाळगलं आहे. मात्र, कॉलेजमध्ये आल्यावर तिला रॅगिंगला सामोरं जावं लागतं. या त्रासाला केलेल्या विरोधातून एक संघर्ष उभा राहतो. त्यात पायलचं काय होतं? तिला न्याय मिळतो का? हे चित्रपटात मांडण्यात आलं आहे. मात्र, केवळ पायलची गोष्ट मांडण्यापुरताच हा चित्रपट मर्यादित नाही, तर या निमित्ताने कॉलेज प्रशासनाचा दृष्टिकोन, शिक्षक-विद्यार्थ्यांकडून मिळणारी वागणूक असे अनेक पदर ही कथा उलगडून दाखवते. आजच्या आधुनिक काळातही होत असलेला हा भेदभाव या चित्रपटातून भाष्य करतो आणि या भेदभावाविषयी नवे प्रश्न उपस्थित करतो.

Maharashtra TimesVandana Gupte On Auto Driver : अमराठी रिक्षावाल्याकडून शिवीगाळ, वंदना गुप्तेंनी तिथल्या तिथे दाखवलेला इंगा! पॅसेंजरला बाहेर काढून थेट रिक्षाच टाकली पाडून
‘जयंती 2’ या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. ‘जयंती’ चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून पायल जाधव , अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे , सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.

Maharashtra TimesRishi Saxena On Isha Keskar : UP चा म्हणून लोक बोलतात, वडिलही फार आनंदी नव्हतेच,ईशा केसकरसोबतच्या १० वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल बरंच काही बोलला ऋषी सक्सेना
चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत प्रभावी आहे. पायलच्या वाट्याला येणारा भेदभाव, त्यातून उभ्या राहणाऱ्या संघर्षाची झलक या ट्रेलरमधून दिसते. त्यामुळेच चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ ह्या चित्रपटाने बरीच चर्चा घडवली होती. आता त्या पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील भेदभाव, त्यातील राजकारणाला ‘जयंती 2’ या चित्रपटाने हात घातला आहे. उत्तम कथानकाला कसदार अभिनेत्यांची जोड मिळाली असल्यानं या चित्रपटाला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या पायल जाधव बद्दल बोलायचे झाल्यास ती कलर्स मराठी वाहिनीवरील अबीर गुलाल या मालिकेत श्री या भूमिकेत झळकली होती. या मालिकेमुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम केले. शेवटी ती झी मराठीवरील तारीणी या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा