Palghar News: सकाळी शाळेत पोहोचण्यासाठी व्यवस्था असली, तरी परतीच्या प्रवासाची सोय नसल्याने शिक्षणाचा हा मार्ग त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाशी जोडला गेला आहे.

या विद्यार्थिनींना सकाळी ऐना-खिडसा परिसरातून साकुरच्या आश्रमशाळेत जाण्यासाठी एसटी बसची सोय होते. मात्र, सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाणारी बस उपलब्ध नसल्याने त्यांना वांगणपाडा फाट्यावर उतरावे लागते. तेथून पुढे सुमारे पाच किमीचा प्रवास त्यांना पायी करावा लागतो. वांगणपाडा फाटा ते ऐना-खिडसा हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. परिसरात वन्यप्राणी आणि सर्पांचा वावर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सायंकाळनंतर रस्ता अंधारात बुडत असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोज अंधारातून मुली घरी परतत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Vishakha Raut : महापौर आणि आमदार राहिलेल्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द, मुंबईत ठाकरेंना मोठा धक्कानियमांमुळे अन्याय ?
आश्रमशाळांमध्ये एका वर्गात ५० विद्याथ्यांच्या प्रवेशाची मर्यादा असल्याने त्यानंतरच्या विद्याथ्यांना ‘डिस्कॉलर’ म्हणून प्रवेश दिला जातो. मात्र, अतिदुर्गम भागातील वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती लक्षात न घेता हा नियम लागू केल्यास त्याचा फटका स्थानिक विद्यार्थ्यांना बसत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ये-जा करून शिक्षण घेणे शक्य नसल्याने काही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पालकांचा संताप
‘शिक्षण हा मूलभूत अधिकार असताना तो मिळवण्यासाठी आमच्या मुलींना रोज जीव धोक्यात घालून जंगलातून चालावे लागते. मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?’ असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
Rickshaw-Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! 1 सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार, किमान भाडे किती वाढले?वसतिगृहात जागा नाही
साकुर येथील आदिवासी कन्या आश्रमशाळेत प्रवेश मिळूनही यंदा जागेअभावी या १२ विद्यार्थिनींना निवासी प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना ‘डिस्कॉलर’ म्हणजेच, ये-जा करून शिक्षण घ्यावे लागत आहे.

