Headlines

Paan Shop Business Monthly income; ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार; पानवाल्याची कोट्यवधींची कमाई पाहून बेरोजगार MBA पदवीधरही थक्क


Reddit Viral Story Post: कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे धडे कोणत्या प्रतिष्ठित महाविद्यालय किंवा पुस्तकातून नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करून मिळतं. एका 34 वर्षीय MBA पदवीधरासोबत नेमके हेच घडलं. MBA पदवीधर तरुण जवळच्या परिसरातील पान विक्रेत्याचे 1 कोटींचे घर, दुकान आणि गाडी पाहून करिअरच्या पारंपरिक मार्गांचा नव्याने विचार करणे भाग पडले.

Reddit MBA Grad Story on Paan Shop Owner Buying Car 1 Cr Flat
पानवाल्याची कोट्यवधींची कमाई पाहून बेरोजगार MBA पदवीधरही थक्क(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Small Business Idea: आजच्या काळात अनेक लोक, सुशिक्षित लोकही, चहा किंवा पानाचे दुकान यांसारखा छोटा व्यवसाय सुरू करूनही चांगले उत्पन्न कमावत आहे. इतरांप्रमाणे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, एक पानवाला किती कमावत असेल? पण तुम्ही या व्हायरल पानवाल्याच्या कमाईबद्दल ऐकलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

छोटे उद्योग-व्यवसाय अनेकदा दिसायाला साधारण वाटतात पण, त्यातून बरेच लोक भरपूर पैसे कमावतात.एका रेडिट वापरकर्त्याने अशाच एका पान विक्रेत्याची कहाणी शेअर केली. अलीकडच्या परिसरातील एका पानाच्या दुकानाला दिलेल्या भेटीने एका 34 वर्षीय एमबीए पदवीधराचे लक्ष वेधून घेतले. या पान विक्रेत्याकडे जवळपास 1 कोटींचे दुकान आणि कार आहे, जे पाहून एका MBA पदवीधरही आश्चर्यचकित झाला.

पान विक्रेत्याची कोट्यवधींची संपत्ती

रेडिट वापरकर्त्याने सांगितले की, त्या दुकानदाराने अंदाजे 1 कोटींची एक कार आणि एक दुकान खरेदी केले. यामुळे त्या MBA पदवीधराने आपल्या आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या लोकांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये पान विक्रेते, किऑस्क मालक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि स्थानिक ज्यूस विक्रेत्यांचा समावेश होता.

Maharashtra TimesMillionaire Post: अमेरिकेत 100 कोटी रुपये कमवणारा भारतातल्या एका छोट्याशा गावात का राहतोय? उद्योगपतीची मनाला भावणारी पोस्टआजच्या काळात MBA सारखी पदवी घेऊनही नोकरीसाठी अनेक मुलाखती द्याव्या लागतात आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा नोकरी बदलून अधिक पैसे कमावणे दिवसेंदिवस कठीण होत आहे, तरी ज्यांना आपण छोट्या पानवाल्याचे दुकान चालवणारे किंवा छोटी-मोठी कामे करणारे समजतो, त्यापैकी बरेच जण चांगली कमाई करत आहेत.

यापैकी कोण प्लंबर आहे, तर कोण इलेक्ट्रिशियन आहे, तर कोण छोटंस दुकान चालवतात, तर काही मोबाईल फोन विकून चांगले पैसे कमावत आहेत, संपत्ती निर्माण करत आहेत आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना रोजगारही देत ​​आहेत.

Maharashtra TimesIncome Tax: एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले; CA ने सांगितले कारण

नोकरी सोडल्यावर दुसरं काम मिळणं मुश्किल

नोकरीच्या शोधात असलेल्या या तरुणाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली, तेव्हा इंटरनेटवर ‘पदवी अधिक महत्त्वाची की कौशल्य?’ यावर चर्चा सुरू झाली. 34 वर्षीय तरुणाची ही तुलना वैयक्तिक होती. टियर-3 कॉलेजमधून MBA पदवी मिळवूनही पाठदुखीमुळे नोकरी सोडल्यानंतर सध्या योग्य नोकरी शोधण्यासाठी धडपडत आहे. उच्च शिक्षणामुळे नेहमीच चांगल्या आर्थिक संधी मिळतात का? याबाबत आता त्याला अनुभवाने आत्मचिंतन करण्यास भाग पाडले.

रेडिटच्या r/ThirtiesIndia वर आपला अनुभव सांगताना त्या युझरने लिहिले, “मी अलीकडेच सिगारेट ओढायला जवळच्या एका पानाच्या दुकानात गेलो होतो. मला कळलं की दुकानदाराने तब्बल 1 कोटी रुपयांची कार आणि दुकान विकत घेतले आहे, त्याच्या घराचे रिनोव्हेशनही करत आहे. मला समजतं की हे खूप कष्टाचं काम आहे. एकदा तर एका व्यक्तीला सिगारेट देण्यास नकार दिल्यामुळे पहाटे 2 वाजता त्याच्यावर चाकूने हल्लाही झाला होता.”

Maharashtra TimesLandlord Tenant Rules: घरमालकांची मनमानी नाही चालणार; दुरुस्ती खर्चावरून वाद कॉमन पण, भाडेकरू कधी जबाबदार? हक्क अन् जबाबदाऱ्या समजून घ्या

पाठदुखी नसती, तर वडा पावचा स्टॉल लावला असता

लक्षात घ्या की वापरकर्ता अनुभवातून आणखी निराश झाला. MBA करूनही योग्य नोकरी शोधण्यात अडचणी येत होत्या, ज्यामुळे छोटा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना अधिकच आकर्षक वाटली. या रेडिट वापरकर्त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “कधीकधी मला वाटतं, मला पाठदुखी नसती, तर मी वडा पाव किंवा रामेनचा स्टॉल सुरू करू शकलो असतो, किंवा ऑनलाइन स्टोअर्सपेक्षा चांगल्या किमतीत मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकू शकलो असतो.”

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा