Headlines

Ordered a 10 Inch Pizza Got 7 Inch One Customer Wins Rs 10520 Compensation | पिझ्झा मागवला होता १० इंचाचा, मिळाला ७ इंचाचा, ग्राहकानं ३ इंचासाठी केली तक्रार, ५०५ रुपयांच्या बदल्यात मिळवले १० हजार


Food Delivery App Complaint: उत्तराखंडमध्ये एका ग्राहकाने १० इंचाचा पिझ्झा ऑर्डर केला, मात्र त्याला ७ इंचाचा पिझ्झा मिळाला. तक्रार करूनही परतावा न मिळाल्याने त्याने ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाने रेस्टॉरंट आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला सेवेतील त्रुटीसाठी जबाबदार धरले. पिझ्झाची किंमत, डिलिव्हरी शुल्क, मानसिक त्रास आणि कायदेशीर खर्चासाठी ग्राहकाला एकूण १०,५२० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले.

Pizza delivery complaint
(ai generated images)
एका व्यक्तीने ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून पिझ्झा ऑर्डर केला होता. त्याने १० इंचाचा पिझ्झा मागवला होता. पण रेस्टॉरंटने त्याला ७ इंचाचा पिझ्झा पाठवला. या चुकीची किंमत रेस्टॉरंट आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला चांगलीच मोजावी लागली. ३ इंचांच्या चुकीसाठी त्यांना तब्बल १० हजार ५२० रुपयांचा फटका बसला. हे प्रकरण ग्राहकाने आयोगात नेले आणि तिथे ग्राहकाच्या बाजूने निकाल लागला. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आहे.

या प्रकरणात नेमकं घडलं काय?

या प्रकरणात नेमकं घडलं काय?

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. तर घडलं असं की, ग्राहकाने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून १० इंचाचा पिझ्झा मागवला होता. या पिझ्झाची किंमत ५०५ रुपये होती. मात्र ग्राहकाला ७ इंचाचा पिझ्झा मिळाला. परिणामी, ग्राहकाने लगेचच अ‍ॅपद्वारे आपली तक्रार नोंदवली. पण फूड डिलिव्हरी अ‍ॅपने त्याला पैसे परत करण्यास नकार दिला. किंबहुना, ही आपली चूक नाही, असं उलट उत्तर त्यांनी दिलं.

पण ग्राहकानेही हार मानली नाही. त्याने या प्रकरणी नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइनवर तक्रार केली आणि संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवली. पण तरीसुद्धा पैसे परत मिळाले नाहीत. मग हे प्रकरण त्याने ग्राहक आयोगात नेले. आयोगाचे अध्यक्ष गगन कुमार गुप्ता, सदस्य डॉ. अमरेश रावत आणि रंजना गोयल यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं. त्यांनी या प्रकरणात ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला. ग्राहकाने जे मागवले होते, तेच उत्पादन मिळणे ही कंपनी आणि रेस्टॉरंटची जबाबदारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच आयोगाने संबंधित पक्षांना एकूण १०,५२० रुपये ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहेत.
(फोटो सौजन्य – Diamond Multimedia Films/pexels.com)

१०,५२० रुपये कसे ठरवले?

१०,५२० रुपये कसे ठरवले?

पिझ्झाची किंमत – ५०५ रुपये
डिलिव्हरी शुल्क – १५ रुपये
मानसिक आणि शारीरिक त्रासासाठी भरपाई – ५००० रुपये
कायदेशीर खर्चासाठी – ५००० रुपये

ही रक्कम आयोगाच्या आदेशाच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेत असून, ग्राहकांच्या अधिकारांबाबत चर्चा होताना दिसत आहे.

(फोटो सौजन्य – Sonali Mehta/pexels.com)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा