Headlines

‘No entry’ for intruders in Europe; 22 countries come together on 6-tier border plan, European countries will check at borders after Ceuta crisis


  • Marathi News
  • International
  • ‘No Entry’ For Intruders In Europe; 22 Countries Come Together On 6 tier Border Plan, European Countries Will Check At Borders After Ceuta Crisis

माद्रिद/लंडन2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

स्पेनमधील सेउता येथे निर्माण झालेल्या घुसखोरीच्या संकटामुळे युरोपचे राजकारण तापले आहे. युरोपियन युनियनमधील (ईयू) २७ पैकी २२ देशांनी बॉर्डर प्लॅन बदलण्याची आणि सीमेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये इटली, ब्रिटन, जर्मनी यांसारख्या देशांचा समावेश आहे. मंगळवारी २७ देशांचे गृहमंत्री घुसखोरांच्या ‘नो एंट्री’ प्लॅनवर चर्चा करतील. हा प्लॅन ६ स्तरांवर तयार केला जाऊ शकतो. स्पेनसह ५ देशांनी २२ देशांच्या या प्लॅनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, स्पेनमधील मूलगामी विचारसरणीचे पक्ष याला ‘परदेशी आक्रमण’ म्हणत आहेत. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनमध्ये हकालपट्टीची मागणी तीव्र झाली.

सीमा सुरक्षा कवचामध्ये या ६ गोष्टी शक्य:

  • पहिले पाऊल: ईयूची बाह्य सीमा मजबूत करणे.
  • दुसरे: ईयूच्या सामायिक बॉर्डर फोर्स (फ्रंटेक्स) मधील अधिकारी, तैनाती वाढवणे.
  • तिसरे: मोरोक्कोसारख्या ट्रांझिट देशांकडून प्रतिबंध आणि वापसी सहकार्याचा आढावा घेणे.
  • चौथे: मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर सामायिक गुप्तचर माहिती, संयुक्त तपास आणि पोलिस कारवाई करणे.
  • पाचवे: आश्रयाचा दावा फेटाळला गेल्यास तत्काळ हकालपट्टी करणे.
  • सहावे: अंतर्गत सीमांवर तात्पुरती तपासणी करणे.

१७ वर्षांत ४ सागरी मार्गांनी युरोपात ३५.२५ लाख घुसखोरांचा प्रवेश

फ्रंटेक्सनुसार २००९ ते २०२५ दरम्यान (१७ वर्षे) चार सागरी मार्गांवर ३५.२५ लाख बेकायदेशीर प्रवाशांच्या एंट्रीची नोंद झाली. पूर्व भूमध्यसागरीय मार्ग, मुख्यत्वे ग्रीस आणि सायप्रसच्या दिशेने, १७.८१ लाख. लीबिया-ट्युनिशियातून इटली आणि माल्टा पोहोचणाऱ्या मध्य भूमध्यसागरीय मार्गावर १३.०३ लाख. मोरोक्को-अल्जेरियातून स्पेनला जाणाऱ्या पश्चिम भूमध्यसागरीय मार्गावर २.६५ लाख आणि अटलांटिक-कॅनरी मार्गावर १.७६ लाख एंट्री झाली.

आफ्रिकन घुसखोरीत टॉप, दक्षिण आशिया दुसरा

युरोपियन युनियनमध्ये २०२५ दरम्यान ७.१९ लाख नागरिक बेकायदेशीरपणे आढळले. यात अल्जारियाचे ७१,०१५ नागरिक असून ते टॉपवर आहेत. दुसऱ्या स्थानावर द. आशियाई देश अफगाणिस्तानचे ४२,७५० व तिसऱ्या स्थानावर मोरोक्कोचे ३९,०५० नागरिक आहेत. टॉप तीनपैकी दोन आफ्रिकन देश आहेत. अल्जारिया व मोरोक्को एकूण घुसखोरीच्या १५% आहेत.

घुसखोरीने युरोपमधील उजव्या पक्षांना सत्तेच्या जवळ पोहोचवले

  • इटली: मेलोनी जलद हकालपट्टी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचे नागरिकत्व काढून घेण्यासारखी पावले उचलत आहेत.
  • ब्रिटन: मूलगामी नेते नाइजेल फराज यांनी हकालपट्टीला सर्वात मोठे हत्यार बनवले.
  • जर्मनी: एएफडी १५० जागांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सीमा तपासणी आणि जलद हकालपट्टीचे धोरण त्यांनी स्वीकारले.
  • फ्रान्स: नॅशनल रॅली १२३ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. २०२७ च्या सत्तेचा हा प्रबळ दावेदार मानला जातो. पक्षाने सीमा तपासणी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्पेनने सेउतामधून ६० हजार स्थलांतरितांना परत पाठवले…

सेउता| स्पेनच्या उत्तर आफ्रिकी भाग असलेल्या सेउतामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी जमा झालेल्या ६० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरितांपैकी बहुतांश जण मोरोक्कोमध्ये परत गेले किंवा त्यांना परत पाठवण्यात आले. सीमा उघडल्याच्या अफवेनंतर लोकांनी पोहून, कुंपण ओलांडून आणि सागरी मार्गाने शहरात प्रवेश केला होता. परंतु सेउतामध्ये पोहोचल्यानंतर मुख्य स्पेनमध्ये जाण्याचा मार्ग त्यांना मिळाला नाही.

अन्न आणि पाणी महाग होते तसेच अनेक जण दोन ते तीन दिवस उपाशी राहिले. काही स्थलांतरितांनी स्थानिक लोकांकडून मारहाण करण्यात आल्याचे आणि हुसकावून लावल्याचे आरोपही केले. परतणाऱ्या लोकांनी सेउताचे वर्णन ‘उघडे तुरुंग’ असे केले. तरीही ४०० लोक अजूनही समुद्रकिनाऱ्यावर ठाम आहेत. यामध्ये सुदानसारख्या संघर्षग्रस्त देशांमधून आलेले आश्रय इच्छिणारे लोकही समाविष्ट आहेत.

शेंजेन क्षेत्र… २९ देशांच्या सीमेवर तपासणी नाही, म्हणूनही घुसखोरी

युरोपचे २९ देश शेंजेन क्षेत्रात आहेत, जिथे अंतर्गत सीमांवर पासपोर्ट तपासणी होत नाही. म्हणजे कोणताही व्यक्ती एका युरोपीय देशात दाखल झाला की त्याला दुसऱ्या अन्य युरोपीय देशात कोणताही चेकपॉइंट पार करावा लागत नाही. हीच बाब आहे की तस्कर आणि प्रवासी दोघेही युरोपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात.

इटली घुसखोरांचे मोठे सागरी प्रवेशद्वार

फ्रंटेक्स ही युरोपीय संघाची सीमा व किनारपट्टी सुरक्षा एजन्सी आहे, जी सदस्य देशांच्या बाह्य सीमांवर अधिकारी, जहाजे, विमाने, ड्रोन आणि निगराणी तंत्रज्ञान देते. याचे जवान ओळख तपासणी, दस्तऐवज पडताळणी व डिपोर्टेशन मोहिमांमध्ये सहकार्य करतात.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत