Nifty PSU Index: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजार दिवसाच्या सुरुवातीपासून दबावाखाली सापडला असून यादरम्यान देशांतर्गत बाजारात सूचिबद्ध खासगी बँकेच्या स्टॉक्समधील पडझडीने या घसरणीचा आणखी भर घातली.
गेल्या आठवड्यात खाजगी बँकांनी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकात सुमारे 2.72% घट झाली.
गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारातील काही PSU कंपन्यांनी तिमाही निकाल जारी केले जे गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर खरे उतरू शकले नाही. अशा HDFC बँकेसोबतच इतर बँकिंग शेअर्सवरही दबाव दिसून आला. ॲक्सिस बँकेचे शेअर्स जवळपास 5% घसरून 1,261.60 रुपयांवर आले, तर कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 2% पेक्षा जास्त घसरून 381.45 रुपयांवर कमी झाले. मात्र, ICICI बँकेचे शेअर्स जवळपास 1% वाढीसह 1,458.40 रुपयांवर वधारले.परिस्थितीत, अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकाल आणि ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टेकने पतमानांकन कमी केल्यामुळे सोमवारी (20 जुलै रोजी) HDFC बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 5% घसरण झाली.
निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकात HDFC बँक आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स सर्वाधिक घसरले आणि प्रत्येकी 5 टक्के घरंगळले. तसेच कोटक महिंद्रा बँक आणि येस बँकेच्या शेअरच्या किमतीत प्रत्येकी 3% हून जास्त घट झाली. याउलट मोठ्या खाजगी बँकांपैकी केवळ ICICI बँकेचे शेअर्स तेजीच्या रंगात रंगले. इतर बड्या खासगी बँकांच्या शेअर्समधील घसरणीला न जुमानता ICICI बँकेच्या शेअरने उत्कृष्ट कामगिरी केली आणि स्टॉकमध्ये तब्बल 2.47% वाढ झाली.
एचडीएफसी बँक स्टॉकमधील आजच्या घसरणील पहिल्या तिमाहीचे निकाल कारणीभूत ठरले. बँकेचा नफा 5% वाढून 18,155 कोटींवरून 19,060 कोटींवर पोहोचला, तर NII किंवा व्याजातून होणारी कमाई 6.7% वाढून 33,534 कोटींवर पोहोचली असून प्रोव्हिजन आणि कँटिनजेन्सी खर्च मागील वर्षीच्या 14,442 कोटींवरून जवळपास 79% कमी होऊन 3,060 कोटींवर कमी झाला. याशिवाय एकूण अनुत्पादक मालमत्ता – Gross NPAs – मागील तिमाहीतील 1.15% वरून 1.17% किंचित वाढला असताना निव्वळ अनुत्पादक मालमत्ता देखील 0.38% वरून 0.41% पर्यंत वाढली.
त्याचवेळी, या खासगी बँकेच्या स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर एक महिन्यात स्टॉकने 0.44 टक्के सकारात्मक परतावा दिला असून तीन महिन्यांत 1.46% आणि सहा महिन्यांत 15.82 टक्के घसरला आहे. इतकेच नव्हे तर एका वर्षात स्टॉकमध्ये 19% घसरण झाली मात्र, 10 वर्षांत या खासगी बँकेचा शेअर 154 टक्क्यांनी वधारला.
इतर बँक स्टॉक्सची स्थिती काय?
HDFC बँकेसोबतच इतर बँकिंग शेअर्सवरही दबाव दिसून आला. ॲक्सिस बँकेचे शेअर्स जवळपास 5% घसरून 1,261.60 रुपयांवर आले, तर कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 2% पेक्षा जास्त घसरून 381.45 रुपयांवर कमी झाले. मात्र, ICICI बँकेचे शेअर्स जवळपास 1% वाढीसह 1,458.40 रुपयांवर वधारले.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा