Headlines

New Marathi Film Patri Sarkar 1942 Poster Out ; Patri Sarkar 1942 : साताऱ्यात प्रतिसरकार स्थापून ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या क्रांतिकारकांची कथा रुपेरी पडद्यावर, ‘पत्री सरकार 1942’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


New Marathi Film On Indian Fighters : ब्रिटिशांच्या राजवटीत साताऱ्यात क्रातिकारकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. या इतिहासावर आधारित एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटली येत आहे.

patri sarkar 1942
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘ पत्री सरकार 1942 ’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं वहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आणि या पोस्टरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात 1942साली प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. नाना पाटलांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी जी डी लाड, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी दरोडेखोरी, जुलुमी,सावकारशाही, इंग्रज सत्ता यांच्याशी यशस्वी लढा देऊन पत्री सरकारची दहशत थेट लंडनच्या संसदेत पोहोचवली. प्रतिसरकारच्या अशा अनेक अज्ञात क्रांतीवीरांची धगधगती शौर्यगाथा घेऊन ‘पत्री सरकार 1942’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

Maharashtra TimesAllu Arjun On Sridevi : श्रीदेवींच्या लग्नाबद्दल समजताच दिवसभर घरात रडत बसलेला अल्लू अर्जुन, स्वत:च सांगितली आठवण
पोस्टर मध्येच हातात बंदूक घेतलेला क्रांतिकारक, घोड्यावर स्वार झालेला योद्धा आणि ब्रिटिश सैनिक यांच्यातील संघर्षाची झलक पाहायला मिळतेय. पार्श्वभूमीला दिसणारी आग, धूर आणि युद्धजन्य वातावरण चित्रपटाच्या कथानकातील संघर्षाची तीव्रता अधोरेखित करत आहे. चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरने एक वेगळाच ऐतिहासिक आणि लढाऊ अंदाज येत आहे.

Maharashtra TimesSudesh Berry : PM मोदी विष्णूंचा अवतार, मला त्यांच्या पायाचे पाणी प्यायचेय, CJP वाले लायकी नसलेले लोक! बॉर्डर फेम अभिनेत्याचे विधान चर्चेत
चित्रपटाच्या पोस्टरवरून हा सिनेमा केवळ मनोरंजन न करता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देणारा ठरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. ‘भागीरथी मोशन पिक्चर’ तर्फे ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट असून विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती लीलया पार पाडली. तर चित्रपटाचे गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन याची धुरा मनीष अनसुरकर यांनी पेलली आहे. कर्तव्य मोकल यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे तर संदीप वाटवे, सुमेध मराठे, परमहंस पाठक यांचे छायाचित्रण आहे. सौरभ लता शिवकुमार यांनी पार्श्व संगीताची जबाबदारी उचलली असून विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक, आनंद मेनन यांनी आपल्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत

पत्री सरकार 1942


चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष अनसुरकर म्हणाले, “ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटातून केला आहे. गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन या धुरा सांभाळताना बरंच दडपण होतं. कारण क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर या चित्रपटातून दाखवायचा होता. पण संपूर्ण टीमच्या मदतीने ते सहज शक्य झालं. क्रांतीच्या इतिहासाला सिनेमॅटिक रूप देत हा चित्रपट बनवला आणि त्याचं पहिलं पोस्टर समोर आलंय. चित्रपटातील टिझर, ट्रेलरवरून आणखी गुपित उलगडतील आणि उत्सुकता नक्कीच वाढेल”. महाराष्ट्राच्या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची आणि क्रांतीकारकांच्या शौर्याची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा