Headlines

Nepal Flood: नेपाळमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर; महाप्रलयात 675 जणांचा करुण अंत; 2400हून अधिक बेपत्ता


वृत्तसंस्था, काठमांडू: नेपाळमध्ये आलेल्या भीषण आकस्मिक पुरातील मृतांचा आकडा शनिवारी ६७५वर पोहोचला. आत्तापर्यंत सुमारे २,५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, २८७ भारतीयांसह २,४००हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. पाऊस, जलपातळीतील वाढ आणि पुन्हा प्रलयाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांच्या १५ हजार कर्मचाऱ्यांनी बचावकार्याला वेग दिला आहे.

नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमस्खलनामुळे पाणी, खडक, चिखल-मातीचा मोठा लोंढा मध्य नेपाळमधील गावांमध्ये शिरून घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तर अनेक जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले. भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आणखी पुराचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Maharashtra TimesNepal Flood : माझा नवरा अंथरुणाला खिळलाय, त्याला सोडून एकटी कशी जगू? महाप्रलयाचे इशारे, नेपाळी महिलेचा घराबाहेर पडण्यास इन्कारनेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमीकरण व व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानुसार, तिथे सात जणांचा मृत्यू झाला. शोध आणि बचावकार्यासाठी ११ हजारहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पाच हजारहून अधिक नेपाळी लष्कराचे जवान आहेत.

जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांतून १९१ कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. धुंचे आणि त्रिशूली येथील आपत्कालीन आरोग्य केंद्रांत १,७०६ पूरग्रस्तांवर उपचार झाले. दरम्यान, मुग्लिंग-काठमांडू महामार्ग शनिवारी पुन्हा सुरू झाला असला तरी मध्य नेपाळमधील अनेक रस्ते अजूनही पुर आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे विस्कळीत आहेत.

Maharashtra TimesNepal Flood Help: नेपाळला नक्की मदत हवी की नको? मदत नको म्हणाल्यानंतर घेतला यू टर्न आता परराष्ट्र मंत्र्यांचे नवीनच विधानभारताचे ११ जणांचे बचाव पथक नेपाळमध्ये

भारताचे ११ सदस्यीय बचाव पथक शनिवारी नेपाळमध्ये दाखल झाले. या पथकात वैद्यकीय कर्मचारी आणि बोगदा बचाव तज्ज्ञांचा समावेश आहे. नेपाळ सरकारच्या विनंतीवरून हे पथक पाठवण्यात आले. रासुवा व मध्य नेपाळात मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी नेपाळने भारत आणि चीनकडे ४२ बेली पूल उभारण्यासाठी मदत मागितली आहे.

Maharashtra Timesया इंजिनीअरला पुरस्कार द्या! भीषण पुरातील घर पाहून आश्चर्याचा धक्का; VIDEO चा शेवट पाहून जग चकितनेपाळच्या अध्यक्षांकडून भारताचे आभार

नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी शनिवारी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले. नेपाळमधील विनाशकारी आकस्मिक पुरानंतर भारत सरकारने व्यक्त केलेली चिंता, मदत आणि ऐक्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नेपाळ सरकार आणि जनतेतर्फे ही कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे अध्यक्षांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर म्हटले.

मुंबईतील ६१ जणांचा ठावठिकाणा नाहीच
मुंबई : मुंबईतील ६१ जणांचा कैलास मानसरोवर यात्रेकरूंचा गट नेपाळ-तिबेट सीमाभागातील आकस्मिक पुरानंतर बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. डॉक्टर-गिर्यारोहक मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांच्या नेतृत्वाखालील हा गट २३ ऑगस्टला मुंबईहून काठमांडूकडे रवाना झाला होता. २५ ऑगस्टच्या संध्याकाळनंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. हा गट पुरापूर्वी चीनमध्ये गेला होता की, नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत