Headlines

Nepal Flash Flood: बांध फुटला, तलाव फुटल्यास पुन्हा महाप्रलयाची शक्यता, नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी – nepal flash flood china flags fresh glacial breach risk


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

२६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाच्या जखमा अजून ताज्याच आहेत. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार ४६९ लोकांचे मृतदेह हाती आले आहेत. बेपत्ता असलेल्या १४०० हून लोकांमध्ये शेकडो परदेशी पर्यटकांचा समावेश आहे, ज्यात सुमारे २९० ते ३०० भारतीय नागरिक आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भिती असून या महाप्रलयामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते उद्ध्वस्त झालेत, पूल वाहून गेले आहेत आणि ११ हून अधिक जलविद्युत प्रकल्प ठप्प झाले आहेत. पण हे संकट इथेच थांबलेले नाही! नेपाळ-तिबेट सीमेवरून आणखी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. त्यातच गुरुवारी उशिरा चीनच्या तिबेट भागात ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस ने दिली आहे. हा भूकंप उत्तर तिबेटमध्ये १० किमी खोलीवर झाला. भूकंपाचे केंद्र नेपाळ आणि चीनच्या त्या पूरग्रस्त भागापासून शेकडो मैल उत्तरेला होते. चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील भागांसाठी रेड अर्लट जारी केला आहे. हा रेड अलर्ट नेमका का आहे आणि पुन्हा एकदा महाप्रलयाचा धोका का निर्माण झालाय ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत