NEET Paper Leak Case Nanded Vidyutnagar Residency Apartment Kadam Family Investigation by CBI Eight Hours; नीटची तयारी करताना विद्यार्थिनीला 120 गुण, पुण्यात सराव परीक्षेवेळी 560 मार्क्स, NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; कुटुंबाची 8 तास चौकशी
NEET Paper Leak Case Nanded Vidyutnagar Residency Apartment Kadam Family Investigation by CBI Eight Hours; नीटची तयारी करताना विद्यार्थिनीला 120 गुण, पुण्यात सराव परीक्षेवेळी 560 मार्क्स, NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; कुटुंबाची 8 तास चौकशी
NEET Paper Leak Nanded Kadam Family Investigation : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरण आता नांदेडमध्ये येऊन पोहोचलं आहे. इथल्या एका उच्चभ्रू परिसरात एका कुटुंबावर सीबीआयने कारवाई केली आहे.
नीट नांदेड प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या एका विशेष पथकाने काल शनिवारी नांदेडमध्ये धडक कारवाई केली. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विद्युतनगर भागातील एका संशयित कुटुंबाच्या घरावर छापा टाकत सीबीआयने तब्बल 7 ते 8 तास कसून चौकशी केली. धक्कादायक म्हणजे सदर कुटुंबीय आपल्या मुलीसाठी लाखो रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. याच संशयावरुन सीबीआयच्या पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईमुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्युतनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलीने यंदाची नीट परीक्षा दिली होती. या मुलीला परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी चक्क 5 लाख रुपये देऊन नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे नांदेडमध्ये तयारी करत असताना विद्यार्थिनीला 100 ते 120 गुण मिळत होते. त्यानंतर ती परीक्षेच्या 15 दिवसापूर्वी पुणे येथे तयारीसाठी गेल्याची माहिती आहे. तिथे तिला सरावामध्ये 560 गुण मिळाले. ही बाब उघडकीस आल्यानंतर सीबीआयने कुटुंबियांची चौकशी केली. या कारवाईदरम्यान सीबीआयच्या पथकाने घरातून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याची विश्वासनीय माहिती आहे. नीट पेपरफुटीचं रॅकेट आंतरराज्यीय स्तरावर पसरलेलं असताना, आता नांदेडमधील या कारवाईमुळे या रॅकेटचं कनेक्शन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांशी आणि मोठ्या एजंट्सशी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाभोवती फास आवळला: तीन मुलांची साक्ष महत्त्वाची ठरणार; लहानग्यांनी नेमकं काय पाहिलं?
नांदेडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ
नांदेड हे मराठवाड्यातील एक प्रमुख शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी येथे हजारो विद्यार्थी येत असतात. अशातच थेट विद्यार्थ्याच्या कुटुंबापर्यंत सीबीआयचं पथक पोहोचल्यानं प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या कारवाईनंतर सीबीआयच्या पथकाने पुढील तपासासाठी आपला मोर्चा कुठे वळवला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे नांदेडमधून आणखी काही जणांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा