Headlines

Navi Mumbai: आई होण्याचं स्वप्न अधुरं! नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप


Navi Mumbai Pregnant Woman Death: राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.

नवी मुंबई महापालिका
नवी मुंबई महानगरपालिका(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. गर्भवतीला इंजेक्शन दिल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित इंजेक्शनचा वापर तत्काळ बंद करण्याचे आदेश देत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन गर्भवतींना ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. दोघीही आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने अर्भकाच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार आवश्यक इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर दोघींनाही अस्वस्थ वाटू लागले.

Maharashtra TimesNavi Mumbai News : जलमय हायवेवरुन चालताना विजेचा धक्का, दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध, रिक्षाचालक प्रवीण महाले ठरले देवदूत, फांदीची ट्रिक उपयुक्त
१ जुलै रोजी त्यांना वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोनम डोंगरे या महिलेचा गर्भासह मृत्यू झाला. रिचा मिश्रा हिला पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इंजेक्शनच्या गुणवत्तेची व संपूर्ण उपचार प्रक्रियेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.

Maharashtra TimesApollo Hospital : जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात; नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स अन् कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश, मर्चंट ऑफिसरला जीवनदान
विशेष चौकशी समिती
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जे. जे. रुग्णालयाचे विभाग प्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ सोसायटीचे सदस्य, तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे .

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा