Headlines

Navi Mumbai Tragedy: कॉलेजची फिल्ड ट्रिप ठरली अखेरची! पळसदरी धरणात बुडून 18 वर्षीय तरुणाचा करुण अंत


Navi Mumbai Student Drowns During Karjat Field Trip: कॉलेजच्या फिल्ड ट्रिपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या घणसोलीतील एका १८ वर्षीय तरुणाचा कर्जत येथील पळसदरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

navi mumbai tragedy
पळसदरी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महाविद्यालयातील प्रोजेक्टच्या कामासाठी आणि फिल्ड ट्रीपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पळसदरी धरणात बुडून मृत्यू झाला. आर्यन दीपक थापर (१८) असे त्याचे नाव असून, तो नवी मुंबईतील घणसोली येथे राहत होता. धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या दीपकला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

खारघर येथील भारती विद्यापीठ कॉलेजचा विद्यार्थी असलेला आर्यन आपल्या पाच मित्रांसह प्रोजेक्टच्या कामासाठी आणि फिल्ड ट्रिपसाठी मंगळवारी कर्जत परिसरात गेला होता. काम संपवून सर्व मित्र परतत असताना पळसदरी भागात त्यांच्या वाहनात तांत्रिक बिघाड झाला. गाडी दुरुस्त करण्यासाठी दोन मित्र मेकॅनिकला आणण्यासाठी खोपोली येथे गेले होते. यावेळी आर्यन आणि त्याचे इतर दोन मित्र पळसदरी धरण परिसरात थांबले होते. यावेळी आर्यनला पोहोण्याचा मोह न आवरल्याने आर्यन धरणाच्या पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पाण्यात दिसेनासा झाला.

Maharashtra TimesNavi Mumbai महापालिकेत ACBची मोठी कारवाई! 42 हजारांची लाच घेताना उपायुक्तांना रंगेहाथ पकडलं
या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी स्थानिक शोध पथकांच्या मदतीने मंगळवारी रात्रभर बेपत्ता आर्यनचा शोध घेतला. परंतु अंधारामुळे त्यांना यश आले नाही. बुधवार सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. सकाळी ८.४५च्या सुमारास आर्यनचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला.
Maharashtra TimesNavi Mumbai News: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली! चार प्रवासी अडकल्याने खळबळ; सकाळच्या गर्दीत प्रवाशांचा खोळंबा
नदीत रिक्षा कोसळून चालकाचा मृत्यू
वसई : तालुक्यातील नायगाव पूर्व येथील चिंचोटी परिसरात रिक्षा अनियंत्रित होऊन नदीपात्रात कोसळल्याने ५६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. नालासोपाऱ्यात कार विहिरीत कोसळल्याची घटना ताजी असतानाच हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. राजेंद्र दुर्बल भारद्वाज असे मृत चालकाचे नाव आहे. १७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ते रिक्षा घेऊन घरी परतत असताना रिद्धी इंडस्ट्रीजसमोर रिक्षा रस्त्यालगतच्या चिंचोटी येथील तुंगारेश्वर नदीपात्रात जाऊन पलटी झाली. नदी सध्या आटलेली असली, तरी अपघातात भारद्वाज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा