Headlines

Navi Mumbai Palm Beach Road Accident Two dies No arrest to Developer Son after one month Crime News; पामबीच रोडवर अपघातात दोघांचा मृत्यू, डेव्हलपरच्या मद्यधुंद मुलांनी उडवल्याचा कुटुंबाचा दावा, 27 दिवसांनंतरही आरोपी मोकाट


Palm Beach Road Accident : अपघातात मरण पावलेला प्रशांत जमदाडे हा आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता, तर हरमन कौर हीदेखील तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती

Navi Mumbai Palm Beach Road Accident Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पामबीच मार्गावर ३ मार्च रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कोपरखैरणे येथे राहणारा प्रशांत जमदाडे (२३) आणि हरमन कौर (१७) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच पोलिस तपासावर तीव्र नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

काय घडलं नेमकं?

या अपघातात मरण पावलेला प्रशांत हा आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता, तर हरमन हीदेखील तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती. या दोघांचा पामबीच मार्गावर ३ मार्च रोजी पहाटे सानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. न्यायासाठी त्यांनी आता प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. एका नामांकित विकासकाच्या मुलांनी दारूच्या नशेत बेफाम वाहन चालवून हा अपघात घडवून आणल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून, त्यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण तपासण्याची महत्त्वाची संधीही गमावली गेली आहे. त्यामुळे प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे सांगत पीडितांच्या कुटुंबियांनी पोलिस तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra TimesAshok Kharat : खरातच्या मोबाईलची क्लोन कॉपी मिळाली, सांकेतिक मेसेज अन् विशिष्ट स्वरुपात नावं सेव्ह, SIT च्या हाती धागेदोरे
या कुटुंबांनी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

खरातला भेटणाऱ्या 39 आमदारांची यादी जाहीर करा, विजय वडेट्टीवारांचे दीपक केसरकरांना आवाहन

मेणबत्ती मोर्चा

या घटनेच्या निषेधार्थ व न्यायाच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी सोमवार, ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शांततापूर्ण मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि कायदेशीर पद्धतीने पार पाडले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra TimesCrime News : इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली

पाम बीच रोड मृत्यूचा सापळा?

पीडित कुटुंबीयांनी पामबीच मार्गावरील वाढत्या अपघातांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आतापर्यंत या मार्गावर अंदाजे १०० ते १५० जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या बांधकामातील त्रुटी, सर्व्हिस रोड अपूर्ण असणे, अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियंत्रणातील त्रुटी, मोठ्या प्रमाणावर लावलेले होर्डिंग या कारणामुळे पामबीच मार्गावरील अपघातात वाढ झाल्याचे नमूद केले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा