Nauheed Cyrusi : लोकप्रिय अभिनेत्री नौहीद सिरूसीनं तिच्या आयुष्यातली कठीण काळाबद्दल भाष्य केलं असून आई न होण्याच्या निर्णयाबद्दलही सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री नौहीद सिरुसीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं आहे. अभिनेत्रीचा दोनदा गर्भपात झाला होता. त्यानंतर तिनं आई न होण्याचा निर्णय घेतला.
नौहीद सिरुसीची पोस्ट
नौहीदनं नुकताच स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आणि तिच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘आमचे लग्न २०१७ मध्ये झालं आणि मी २०१८ मध्ये पहिल्यांदा गरोदर राहिले. दुर्दैवाने, तिसऱ्या महिन्यात माझा गर्भपात झाला. डॉक्टरांनी मला माझ्या कुटुंबाला कळवण्यास सांगितलं. आम्ही आमच्या शेवटच्या तपासणीसाठी गेलो, आणि दुर्दैवानं बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झाल्याचं समजलं.’ Mandar Cholkar : ‘चार महिने झाले निर्मात्याने पैसे बुडवलेत’, चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक, सांगितला प्रसंग
आई न होण्याचा निर्णय घेतला
‘कोविडच्या काळात, मी दुसऱ्यांदा गरोदर राहिले. तेव्हाही माझा गर्भपात झाला. तोपर्यंत, आम्ही आमच्या आयुष्याबद्दल विचार करायला सुरुवात केली होती. माझ्या लक्षात आलं की, फक्त मुलांना जन्म देणं हाच आयुष्याचा उद्देश असू शकत नाही. आपण जशा वातावरणामध्ये वाढलो तसं आताचं जग राहिलेलं नाही, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल, त्यामुळे आम्ही मुलांऐवजी गरजू प्राण्यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला.’ ‘कदाचित आमच्या आयुष्याचा उद्देश हा मुक्या प्राण्यांची काळजी घेणं हाच असावा. कारण अशा अनेक प्राण्यांना आमची आणि आमच्या प्रेमाची गरज आहे. अनेक वर्षांपासून मी आणि माझा पती प्राण्यांसाठी काम करतोय, पण याबद्दल फारसं कोणाला माहिती नाही. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायला विसरले, ती म्हणजे मला कोणत्याही प्रकारची आयव्हीएफ (IVF) प्रक्रिया करायची नव्हती. मला वाटलं की जर मूल आमचं होणार असेल, तर ते आमचंच होईल, आणि मला त्या मार्गावर जायचं नव्हतं.’ असं अभिनेत्रीनं शेवटी सांगितलं.
दरम्यान, नौहीद सिरुसीनं २००३ मध्ये ‘सुपारी’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं ‘इन्तेहा’, ‘अन्वर’, ‘भूतनाथ’ आणि ‘लाइफ में कभी कभी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. ती ‘हिप हिप हुर्रे’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्येही दिसली होती.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा