Headlines

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela Work Disrupts Electricity Water Supply and Internet Services; सिंहस्थाच्या कामांनी त्र्यंबकची नाकाबंदी; रहदारीसाठी रस्तेच नाहीत, वीज, पाणीपुरवठा अन् नेट सेवाही खंडित


Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : जागोजागी खोदलेले रस्ते दोन महिन्यांपासून तसेच पडले आहेत. रस्ते खोदतांना जलवाहिन्या आणि मलजलवाहिन्या फुटल्याने सर्वत्र निर्माण झालेला चिखल आणि दुर्गंधी यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रहदारीसाठी रस्ते बंद झाल्याने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तेथील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नागरिकांना नित्य व्यवहार करताना चक्रव्यूह पार करावे लागत असल्याचे दिव्य करावे लागत आहे.

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela
सिंहस्थ कुंभमेळा नाशिक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक (त्र्यंबकेश्वर) : सिंहस्थाच्या विकासकामांनी त्र्यंबकेश्वर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज आणि पाणीपुरवठा या जीवनाश्यक सेवा बेभरवशाच्या झाल्या आहेत, तर इंटरनेटवर सर्व काही अवलंबून असताना ती सेवा नॉटरिचेबल झाली आहे. शहरातील खोदलेल्या रस्त्यांनी ही परिस्थिती ओढावली आहे. अधिक महिन्याची अमावास्या आणि शनिवार, रविवारची सुट्टी असा दुहेरी पर्वकाल साधण्यासाठी शहरात भाविकांची गर्दी उसळली असताना शहराच्या अर्ध्या भागात वीज नाही, तर बहुतांश भागात पाणी नाही अशी परिस्थिती आहे.

पाण्याअभावी हवालदिल

अधिकमास रविवारी (दि. १४) संपतो आहे म्हणून शहरात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. निवासी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. तथापि त्यांना लॉजिंग सुविधा देणारे वीज आणि पाण्याअभावी हवालदिल झाले आहेत. टँकरने पाणी आणले तर ते छतावरच्या टाकीत पोहचवण्यासाठी वीज नसते. खाद्य पदार्थ विक्रेत्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागणारे पदार्थ टिकवायचे कसे असा प्रश्न पडला आहे. आइस्क्रिमसारख्या पदार्थांची विक्री थांबली आहे. शहरातील खोदलेल्या रस्त्यांनी भूमिगत वीजवाहक तारा तुटतात तसेच जलवाहिन्या फुटतात त्यामुळे या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. ऑप्टिक फायबर केबल तुटल्याने इंटरनेटसेवा विस्कळीत आहे. त्यावर अवलंबून असणारे डिजिटल पेमेंट, बॅकिंग आणि इतर सर्व व्यवहार कधी बंद, तर कधी चालू अशी हेलकावे घेत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये नेहमीच मुसळधार पाऊस असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील जीवनमान किती विस्कळीत होईल, याची कल्पनाच केलेली बरी!
Maharashtra TimesSmart Meter : स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग, पण मीटरबाबत नागरिकांचा संताप, कारण काय? स्मार्ट मीटरचे नेमके फायदे कसे?

पाच वर्षांपासून यातना

त्र्यंबक नगरीत सातत्याने विकास कामे सुरू आहेत. यामध्ये कधी प्रसाद योजनेतून सुरू असलेली कामे, तर कधी शासनाच्या निधीतून होणारी रस्त्यांची आणि गटारींची कामे यांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर शहारत भुयारी गटारीचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी शहरातील खोदलेल्या रस्त्यांनी वाहतुकीचा बोजवारा उडवला. थातूर मातूर काम करीत बुजवण्यात आलेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्याने निर्माण होणारी बिकट परिस्थिती नागरिकांनी सलग चार वर्ष अनुभवली. आता सिंहस्थ विकासकामांनी संपूर्ण शहराचीच नाकाबंदी झाल्याने त्याचा फटका येथील पर्यटनालादेखील बसत आहे.
Maharashtra TimesNashik News : शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?

रहदारीसाठी रस्तेच नाहीत

येथे आलेले भाविक पूजा करणाऱ्या गुरुजींचा अथवा निवास व्यवस्था असलेल्या लॉजिंगचा ठावठिकाणा मोबइलवर लोकेशनच्या आधारे शोधतात. मात्र त्यामुळे फसगत होत आहे. रात्री आलेल्या भाविकांना तर मोबइलमध्ये नकाशात दिसणारा रस्ता प्रत्यक्षात खोदून ठेवल्याचे अगदी जवळ गेल्यानंतर लक्षात येते. अनेकदा माघारी फिरण्याची देखील सोय नसते. खोदलेले रस्ते आणि त्यात आहे त्या रस्त्यावर भाविक, प्रवासी अथवा स्थानिक रहिवासी यांनी उभी केलेली वाहने यामुळे रहदारीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत रुग्णवाहिका चालवणे व रुग्णाला वेळेत उपचारासाठी घेऊन जाणे अशक्य होत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा