Headlines

Nashik tcs conversion case major evidence revealed by google search hearing in court against suspects; नाशिक धर्मांतराप्रकरणी सर्वात मोठा पुरावा समोर; गुगल सर्चमुळे झाला भांडाफोड


म. टा. प्रतिनिधी, नाशिक: बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नातील संशयितांनी पीडितेचे ‘हानिया’ असे नामांतर करण्यासाठी ५ एप्रिल २०२५ म्हणजे एक वर्षापूर्वी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे स्वतःकडे घेत त्यांनी नामांतर करून तिच्या बदललेल्या नावे नऊ हजार रुपयांची ‘जकात’ भरल्याचे स्पष्ट झाले. याबाबत न्यायालयात ‘एसआयटी’ने पुरावे दिले आहेत.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान यांच्यावर गुन्हा नोंद आहे, तर छत्रपती संभाजीनगरातील ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन पटेल, घरमालक हानिफ शेख यांना शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सहसंशयित केले आहे. मतीनने निदाला हानिफचे घर उपलब्ध करून देत आश्रय दिला होता. या गुन्ह्यातील संशयित दानिश याला काही दिवसांपूर्वी मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ने पाठींबा दिला होता. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आशिफ शेख यांनी दानिशला वकील व कायदेशीर मदत पुरवली आहे. त्यानंतर खटल्याची दुसरी सुनावणी २२ जून नाशिकरोड न्यायालयात झाली होती. त्यावेळी मध्यवर्ती कारागृहातून निदाचा वैद्यकीय अहवाल मागवणे, हा अर्ज निदाच्या वकिलांनी सादर केला. अर्ज मंजूर करून निदाच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश कारागृह प्रशासनासह पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, निदा गर्भवती असून, तिच्या शरीरातील लोह कमी झाले आहे. तिला कारागृहात जड कामे करावी लागत आहेत. काही दिवसांपूर्वीच्या वैद्यकीय तपासणीत तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले होते. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाल्याने आता वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला होता.

निदासह दानिश शेख व तौसिफ अत्तार यांचा मुक्काम नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. त्यांच्या जामिनाबाबत १९ जून रोजी सरकारी व विरोधी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद झाला होता. तीन तास चाललेल्या युक्तिवादानंतर निकालासाठी २५ जून रोजी अंतिम आदेशासाठी सुनावणी होती. मात्र, न्यायालयाच्या व्यस्ततेमुळे २५ जून रोजी जामिनाबाबत आदेश जारी झाले नव्हते. मंगळवारी (दि. ३०) पुन्हा आदेशासाठीची सुनावणी आहे. त्यांना जामीन मिळणार की फेटाळण्यात येणार याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष आहे. याप्रकरणात तब्बल पंधराशे पानांचे दोषारोपपत्र दाखल आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत