Nashik Sangamner Pune Railway Project Halted : विशेष म्हणजे, २०२० पासून या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रकल्प मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झालेल्या असतानाच तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात
जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचा दाखला देत रेल्वे मंत्रालयाने पुणे-संगमनेर-नाशिक सरळ रेल्वेमार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक वर्षांपासून निवडणुकांच्या जाहीरनाम्यांपासून ते सार्वजनिक व्यासपीठांपर्यंत गाजलेल्या या प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात गेल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
Ayodhya Poul Patil : नागेशमामा, सोबत कोण आहेत सांगू का? ठाकरेसेनेने बंडखोर खासदारांना डिवचलं, तुमच्या ‘वर्मा’त हात घातल्यासारखे होईल!
या रेल्वेमार्गामुळे सिन्नर आणि चाकण ही राज्यातील महत्त्वाची औद्योगिक केंद्रे थेट जोडली जाणार होती. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन उद्योगांना नवी गती मिळाली असती. याशिवाय हजारो रोजगारनिर्मितीबरोबरच विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवाशांसाठीही प्रवास अधिक सुलभ झाला असता. दरम्यान, या निर्णयाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या लासलगावहून मुंबईला रेल्वेमार्गाने कांदा पाठविण्यासाठी प्रति टन सुमारे २५० रुपये खर्च येतो. मात्र, रेल्वे सुविधा नसल्याने सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर व आंबेगाव परिसरातील शेतकऱ्यांना त्याच मालाच्या वाहतुकीसाठी प्रति टन २,५०० ते ३,००० रुपये मोजावे लागतात. रेल्वेमार्ग अस्तित्वात आला असता, तर शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात मोठी बचत झाली असती.
Pune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट
भावी पिढ्यांचा विकास हेच प्राधान्य
केंद्र सरकारने विकास प्रकल्पांचा विचार करताना केवळ आर्थिक नफा-तोट्याचा विचार न करता जनतेचे हित आणि भावी पिढ्यांचा विकास हेच प्राधान्य ठेवले पाहिजे. नाशिक-सिन्नर-संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेला नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द केल्याने नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठा धक्का बसला असून, या असंवेदनशील निर्णयाचा आपण जाहीर आणि तीव्र निषेध करीत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली. त्याचबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे, त्याचबरोबरीने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

