Headlines

Nashik News: वैद्यकीय सेवा २४ तास बंद! ‘बीएचएमएस’ डॉक्टरांच्या नोंदणी प्रस्तावाविरोधात संघटना आक्रमक – ima announced 24-hour suspension of regular medical services in maharashtra on 4 august 2026


Nashik News: सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात.

medical strike
वैद्यकीय सेवा २४ तास बंद(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये ‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) महाराष्ट्र राज्य, मार्ड (एमएआरडी), असमी (एएसएमआय) आणि इतर विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरात २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंदची घोषणा करण्यात आली आहे. हा संप आज (दि. ४) सकाळी ६ वाजता सुरू होऊन उद्या (दि. ५) सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया तरीही सुरूच राहिली तर हे सेवाबंद आंदोलन अनिश्चित काळासाठी पुढे चालवले जाईल, असा इशारा डॉक्टरांच्या संघटनांनी दिला आहे.

Maharashtra TimesNitesh Rane: नितेश राणेंविरोधात मच्छिमारांचा संताप; थेट बडतर्फची मागणी, मोठं नुकसान झाल्याचा आरोप
बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांना अ‍ॅलोपथीच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देणे हे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक आधाराला छेद देणारे असल्याची या संघटनांची भूमिका आहे.

यासंदर्भात संबंधित शासकीय विभाग व मंत्रालयाकडे अनेकदा निवेदने, पत्रव्यवहारांद्वारे चिंता व्यक्त करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने सार्वजनिक आरोग्याच्या व्यापक हितासाठी आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय पद्धतींचे मानदंड जपण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे ‘आयएमए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे आंदोलन रुग्णांच्या विरोधात नाही. तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मानदंडांच्या संरक्षणासाठी असल्याचेही आयएमएने नमूद केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर ‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई व राज्य खजिनदार डॉ. अमोल गिते यांची स्वाक्षरी आहे.

Maharashtra TimesGirish Mahajan : कथित ऑडिओ क्लिपमध्ये खडसे कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह शब्द, पत्रकारांची विचारणा, गिरीश महाजन यांचा काढता पाय
पेपरफुटीची शिष्पक्ष चौकशी करा
नाशिक : स्पर्धा परीक्षा पेपरफुटीची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संघटनेने सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन दिले. नीट, टीईटी, एमएच सीईटी तसेच एमपीएससीसह विविध भरती परिक्षांमध्ये सातत्याने पेपरफुटीचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये असंतोष आहे. शिक्षणव्यवस्था तसेच स्पर्धा परीक्षेवरील विश्वास डळमळीत होत असल्याने या सर्व गैरव्यवहारांची निष्पक्षपणे चौकशी करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पेपरफुटीत सहभागी अधिकारी, कर्मचारी, दलाल, खासगी संस्था व संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी. दोषी परीक्षा केंद्र काळ्या यादीत टाकावे, पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक सुरक्षा व्यवस्था लागू करावी, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी यंत्रणा स्थापन करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा