Headlines

Nashik Monsoon Update There is No Water in Reservoirs of Dams; मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी, कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?


Nashik Monsoon Updates : संकटकाळी उपयोगी पडतील म्हणून येथे विस्तीर्ण तलाव बांधलेले आहेत. त्या तलावातील पाणी उपसा करून त्यांची डागडुजी करण्याच्या नावाने कोरडेठाक केले आहेत. नियोजनाची दिवाळखोरी भविष्यात दुष्काळाचे संकट ओढावल्यास त्याचे चटके येथील सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागतील अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे.

Nashik Monsoon Updates
महाराष्ट्र मान्सून अपडेट्स(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : चैत्र आणि वैशाख महिन्यात हमखास बरसणाऱ्या वळवाच्या सरी यावर्षी आल्या नाहीत. त्यात मृगनक्षत्राने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे जलाशयांची माया अटली आहे. रानावनात हिरवळ निर्माण झालेली नाही. सर्वत्र वैराण वाळवंटाप्रमाणे रखरखीत उन्हाळा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही कायम राहिला आहे. मानवी वस्तीला पिण्याच्या पाण्यासह पशुधनाला आवश्यक असणारे चारा पाणी आता दुरापास्त होत आहे. यापुढील चार दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर भीषण दुष्काळाची चाहुल लागली, असे म्हणावे लागेल अशी स्थिती आहे.

डोंगराकडे दुष्काळाची भयाण चाहुल

शाळा-महाविद्यालयांना आता सुरुवात झाली आहे. दरवर्षी आतापर्यंत नदी नाले प्रवाहीत झालेले असतात आणि हिरवाईने नटलेल्या डोंगरकड्यांचा आनंद घेण्यासाठी तरुणाईची पाऊले पहिणे बारी, दुगारवाडी या निसर्गस्थळांकडे वळतात. यावर्षी पहिणे बारीतील नदी प्रवाहात दगड गोटे दिसत आहेत, तर रखरखीत डोंगराकडे दुष्काळाची भयाण चाहुल दाखवत आहेत. त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळा विकासकामे होत आहेत. तलावांच्या सुशोभीकरणासाठी ते कोरडेठाक केले आहेत. पाऊस लांबल्यास जनावरांना पिण्यासाठी थेंबभर पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती विकासकामांसाठी निर्माण करण्यात आली आहे. भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन शासन यंत्रणा पाणी जपून वापरण्याचा सल्ला देत आहे. मात्र, विकासकामांसाठी पाण्याचा वारेमाप वापर होत आहे.
Maharashtra TimesOmraje Nimbalkar : पवनराजे केसमधील सर्व आरोपी निर्दोष, ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर, राजकीय निर्णयाबाबत थेट भाष्य

जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र सात जूनलाच सुरू झाले. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका आणि बाजरी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटीच मशागती करून शेती पेरणीसाठी तयार ठेवली आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करून लाखो रुपयांची गुंतवणूकही केली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पेरणीला मुहूर्तच मिळत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यातील टेहरे येथील शेतकरी गुलाब शेवाळे सांगतात, “एकरला आठ ते दहा हजार रुपये खर्च करून मका बियाणे घेतले. आता पाऊस नाही म्हणून ते घरातच पडून आहे. उशीर झाला तर उगवण क्षमता कमी होते. केवळ पेरणीचाच नाही, तर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे.’’

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा