Headlines

Nashik MHADA Scam: नाशिक महापालिकेचा दणका! म्हाडा घोटाळ्यातील 42 लेआउट रद्द, सामान्यांची घरेही कचाट्यात, प्रकरण काय? – mhada 42 final layouts approved by nashik municipal corporation have been cancelled


MHADA Housing Scam Nashik: विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेने मोठी कारवाई केल्याने विकसकांसह बिल्डर, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

nashik MHADA scam
नाशिक म्हाडा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर करून म्हाडा घरकुल घोटाळा करणे विकासकांना आता चांगलेच महागात पडले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे तुकडे पाडून महापालिकेकडून मंजूर करून घेतलेले ४२ अंतिम लेआउट महापालिकेच्या नगररचना विभागाने रद्द केले आहेत. यापूर्वी ३० तात्पुरते लेआउट रद्द केले होते. त्यामुळे ही संख्या आता ७२ पर्यंत पोहोचली आहे.

Maharashtra TimesNashik FDA Raid: भेसळखोरांना FDAचा दणका! विशेष तपासणी मोहिमेत तब्बल 20 लाखांचा माल जप्त, नाशिक विभागात खळबळ
महापालिका हद्दीतील एक एकरपुढील भूखंडावर आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव सदनिकेच्या नियमातून पळवाट काढण्यासाठी बिल्डरांकडून बनावट कागदपत्रे सादर करून सातबाऱ्याचे तुकडे पाडून म्हाडा घरकुल घोटाळा झाल्याचे समोर आले. विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने १९७ बिल्डर, विकसकांवर गुन्हे दाखल केले, तर सरकारनेही विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. त्यानंतर महापालिकेनेही १०८ प्रकरणांपैकी घोटाळा झालेल्या ४९ प्रकरणांत सहभागी असलेल्या बिल्डरांसह १९७ जणांना मंजूर अंतिम लेआउट रद्द का करू नये, अशा नोटिसा एप्रिलमध्ये बजावल्या होत्या. आता ४९ सर्व्हेमधील अंतिम ४२ लेआउट कायमस्वरूपी रद्द केले आहेत.

Maharashtra TimesPandharpur: पंढरीत भाविकांची मांदियाळी! सुमारे 25 लाखांहून अधिक संख्या; दर्शनासाठी 30 ते 32 तासांचा वेळ
प्लॅट, प्लॉटधारकांचीही फसवणूक
म्हाडा घरकुल घोटाळ्याची एसआयटीकडून चौकशी सुरू असताना पोलिसांनीही या प्रकरणात काही अधिकाऱ्यांसह विकसकांवर अटकेची कारवाई केली आहे. त्यानंतर या प्रकरणात विकसकांनी बनावट कागदपत्रे तयार करून महसूलसह महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका नगररचना विभागाने ठेवत लेआउट रद्द केले आहेत. त्यामुळे या लेआउटवरील प्लॉट, तसेच उभ्या केलेल्या इमारतीही आता अनधिकृत ठरल्या आहेत. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांसह प्लॅटधारकांचीही आता फसवणूक झाली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा