Headlines

Nashik FDA Raid: नाशिकमध्ये Zeptoवर एफडीएची कारवाई! अन्न परवाना निलंबित, तपासणीत स्वच्छता-आरोग्यविषयक निकषांचं उल्लंघन – fda action against zepto in nashik food license suspended inspection reveals violations of hygiene


FDA Raid On Zepto: राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-15T080039
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नाशिक: डिजिटल युगात ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा करणाऱ्या ऑनलाइन सेवांच्या पडद्यामागील विदारक वास्तव नाशिकमध्ये समोर आले आहे. नाशिक शहरातील सिडको भागातील ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवणाऱ्या ‘ मे. झेप्टो लिमिटेड’ या आस्थापनेच्या गोदामात अस्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांची उघड पायमल्ली होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत उघडकीस आले.

प्रशासनाने या ऑनलाइन डिलिव्हरी सेंटरचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला आहे. वेगवान सेवेच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ सुरू असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले.

या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीची आणि ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी सिडको येथील झेप्टोच्या गोदामाची आणि साठवणूक केंद्राची आकस्मिक पाहणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि अमित रासकर यांच्या पथकाने केलेल्या या तपासणीत अस्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे उघड उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.

Maharashtra TimesAditya Thackeray: देवाच्या पैशांवरच भाजपचं लक्ष; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मोर्चासाठी नाशिककरांना आवाहनअन्नपदार्थ साठवण्याच्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरले होते. तसेच स्वच्छता व सुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन केले जात नव्हते. ज्या ठिकाणी नागरिकांचे खाद्यपदार्थ साठवले जातात, त्याच ठिकाणी दुर्गंधी आणि आरोग्यास घातक ठरेल अशी अवस्था निर्माण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने कोणतीही गय न करता परवाना निलंबनाची कठोर कारवाई केली. या धडक कारवाईमुळे निष्काळजीपणे कारभार करणाऱ्या इतर ऑनलाइन अन्नपुरवठादार कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, ऑनलाइन अथवा ऑफलाइन खरेदी केलेल्या कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत, स्वच्छतेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत शंका अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra TimesNashik Crime : केमिकलमध्ये नोट टाकली, नंतर चपातीसारखी लाटली, नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्तगेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची खातरजमा केल्यानंतर गोदामाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्या. त्यामुळे ‘मे. झेप्टो लिमिटेड’चा परवाना निलंबित करण्यात आला आहे.-अमित रासकर, अन्न सुरक्षा अधिकारी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा