Headlines

Nashik District Collector Ayush Prasad Work of Elder Couple while Sitting on Tree Stump; ‘क्लास 1’ अधिकाऱ्याने माणुसकी जपली! जिना चढताना आजी-आजोबांना धाप लागली, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दाम्पत्याचं काम झाडाच्या पारावर बसून केलं


Nashik District Collector Ayush Prasad : ‘गंभीरचंद सुरंजे यांची सहज विचारपूस केली असता त्यांची समस्या लक्षात आली. हे काम लगेच होणार होते. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना बोलावून घेत विषय मार्गी लावला. हे नियमित प्रशासकीय काम असून वेगळे काहीच नाही’, असं नाशिकचे डॅशिंग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे.

Nashik District Collector Ayush Prasad
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वृद्ध दाम्पत्याचं काम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : जमिनीशी संबंधित आपल्या प्रस्तावाचे पुढे काय झाले याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वृद्ध दाम्पत्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या माणुसकीचा आणि अधिकाऱ्यांमधील संवेदनशीलतेचा प्रत्यय आला. जिना चढताना धाप लागणाऱ्या या दाम्पत्याचे काम झाडाच्या पारावर करून देत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी त्यांना सुखद दिलासा दिला.

जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता

देवळाली येथे भीमाबाई गंभीरचंद सुरंजे यांच्या मालकीची मिळकत आहे. ही मिळकत भोगवटादार वर्ग दोनमधून भोगवटादार वर्ग १ (क वर्ग सत्तप्रकार) मध्ये रुपांतरित करण्याकरीता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला. यावरील कार्यवाहीची माहिती घेण्याकरीता ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढत होते. त्याचवेळेस जिल्हाधिकारी प्रसाद पायऱ्या उतरत होते. त्यांनी सुरंजे यांची विचारपूस केली. तसेच पायऱ्या चढून वर जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत कार्यालयाच्या आवारातील वडाच्या झाडाखाली पारावर बसविले. निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांना लॅपटॉपसह पाराजवळ येण्याची सूचना केली. राजपूत तत्काळ तेथे आले. प्रकरण अंतिम करून नजराणा भरण्याकरीता सुरंजेंना चलन देण्यात आले.
Maharashtra TimesPune News: शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करता येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार, काय आहे नवा उपक्रम?

अडीच हजारी दर्शनासाठी रांगा

शुक्रवार ते रविवार या सलग शासकीय सुट्ट्यांचा लाभ घेत भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. २०० रुपये सशुल्क दर्शनासाठी जास्त गर्दी असून, देवस्थानने गत महिन्यात सुरू केलेल्या अडीच हजार रुपये ‘व्हीआयपी’ दर्शनालाही गर्दी होत आहे. भाविकांकडून अडीच हजार रुपये देणगी पावती घेऊन त्यांना थेट सभामंडपाच्या उत्तर दरवाजात सोडले जाते. तथापि, तेथे पूर्व दरवाजा मोफत दर्शनबारीने आलेले भाविक रांगेत असतात. त्यात २०० रुपये तिकीट घेऊन त्या रांगेतून आलेले भाविकदेखील सभामंडापच्या उत्तर दरवाजाने सोडलेले असतात. गर्भगृहासमोर अडीच हजार रुपये देऊन आलेल्या भक्ताच्या हातात असलेली देणगी पावती पाहून त्याला दर्शनासाठी हात जोडण्याची संधी दिली जाते.
Maharashtra TimesByculla Moharram : मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोग; मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या, भायखळ्यात 30 हजार भाविकांना संपवण्याचा कट
मंदिराच्या बाहेर मंडप टाकून अडीच हजार रुपयांचे देणगी दर्शन घेणाऱ्या भाविकांना उभे राहण्याची अथवा बसण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, मंडपाबाहेर रांग लागते, तेथे काही वेळा तास दोन तास थांबावे लागते. त्यानंतर आणि मंदिरात दर्शनबारीत सोडल्यानंतर इतर भाविकांप्रमाणे दर्शन घेऊन बाहेर पडावे लागते. साहजिकच अडीच हजार रुपये देऊन होणारे ‘व्हीआयपी’ दर्शन भाविकांना फारसे पसंत पडत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी पालखी प्रस्थान असल्याने तेव्हाही त्र्यंबकनगरीत गर्दी राहणार आहे. मंगळवारनंतर गर्दीत काहीसा उतार पडण्याचा अंदाज आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा