Nashik Dengue Cases: आठवडाभरातच तापसदृश आजाराचे हजारावर रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाची झोप उडाली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात साथरोगांचा प्रादुर्भाव वेगाने होतो. डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांची लागण होते. यंदाही नाशिकमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. जूनपर्यंत डेंग्यूची रुग्णसंख्या आटोक्यात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३, तर जून महिन्यात जेमतेम आठ रुग्ण होते. जुलैत पावसाचा जोर वाढल्यानंतर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्या डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला.
Central Railway: रोजची धक्काबुक्की बंद! आता कर्जत, खोपोलीसाठीही 15 डबा लोकल; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मध्य रेल्वेचा निर्णय, पाहा वेळापत्रकमहिनानिहाय आढळलेले रुग्ण
जानेवारी ६
फेब्रुवारी ३
मार्च २
एप्रिल १
मे ३
जून ८
जुलै ८
ऑगस्ट २९
FDA Action : गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाईतापसदृश आजाराचे हजारावर रुग्ण
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्यापाठोपाठ तापसदृश आजाराची साथ शहरात दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरातच तापसदृश आजाराचे हजारावर रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केवळ महापालिकेच्या रुग्णालयांमधील आहेत. शहरातील खासगी रुग्णालये, दवाखान्यांमधील तापसदृश आजाराची रुग्णसंख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अंगदुखी, डोकेदुखी, थंडीताप अशी या आजाराची लक्षणे आहेत.
गोदाकाठ परिसरात स्वच्छता मोहीम
पंचवटी : महापालिकेचा गोदावरी संवर्धन कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रहार संघटना, आम्ही नाशिककर, गोदा वॉक वे हास्य क्लब आणि महाबली अकॅडमीतर्फे गुरुवारी गोदा पार्कजवळील गोदावरी नदीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नदीकाठावरील कचरा, प्लास्टिक बाटल्या आदी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. जॉगिंग ट्रॅक परिसरातील झाडे-झुडपेही स्वच्छ करण्यात आली

