Headlines

Nashik Ayodhya Nagari Doctor Couple two daughters die after falling in Water tank Crime News; घराला कुलूप लावून डॉक्टर दाम्पत्य क्लिनिकला, परत येताच हृदयद्रावक दृश्य, सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत अंत


म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पालकांचे क्षणभराचे दुर्लक्ष आणि सुरक्षेअभावी बालकांचे प्राण जाण्याच्या घटना नाशिक शहरात थांबत नसून, गेल्या १९ महिन्यांत म्हणजे साधारण दीड वर्षात अकरा बालकांचा असा चटका लावणार अंत झाला आहे. म्हसरुळ येथे घरातील पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा शनिवारी असाच करुण मृत्यू झाला. चहा बनविताना, पाण्यात खेळताना, घरात रांगताना बालकांकडे पालकांच्या झालेल्या जराशा दुर्लक्षाने नकळत्या वयात चिमुकल्यांना जीवनाचा निरोप घ्यावा लागल्याचे कटू वास्तव पोलिस तपासातून समोर आले आहे.

शनिवारी (दि. १५) ऑगस्ट रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास एका डॉक्टरच्या कुटुंबातील आठ आणि चार वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असली, तरी पालकांचे बालकांकडे होणारे दुर्लक्ष हे त्यामागील मुख्य कारण ठरत असल्याचेही अधोरेखित झाले आहे.

नेमकी घटना काय ?

नाशिकमधील अयोध्यानगरी भागातील शुभम कॉलनीतील गजगणेश रो-हाउस दोनमध्ये डॉ. विशाल सोनवणे हे पत्नी डॉ. शीतल सोनवणे आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. शनिवारी डॉक्टर दाम्पत्य दोन मुलींना घरी ठेवून क्लिनिकमध्ये गेले होते. क्लिनिकमध्ये जाताना त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले होते. डॉ. विशाल यांना उशीर होणार असल्याने डॉ. शीतल यांनी क्लिनिक बंद करून घर गाठले. त्यांनी घराचे कुलूप उघडले असता घरात दोन्ही मुली दिसल्या नाहीत. त्यांना स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी बाहेर डोकावले असता पाण्याच्या टाकीचे झाकणही उघडे होते. त्यांनी टाकीत डोकावून पाहिले असता दोन्ही मुली पाण्याच्या टाकीत दिसल्या आणि त्यांनी हंबरडा फोडला.

Maharashtra TimesTwisha Sharma : बायकोचे अवशेष उद्या न्यायला सांग, आता मला शांततेत मरु दे; Ex मिस पुणेचा वहिनीला शेवटचा मेसेज, काही मिनिटात मृत्यूला मिठीशहरात सन २०२४ मध्ये झोक्याचा फास लागून, पाण्याच्या डबक्यात पडून, उंचावरून पडून, मॉलमध्ये खेळताना पडल्याने बालकांच्या मृत्यूच्या घटना नोंदविण्यात आल्या. सन २०२५ मध्ये सात आणि सन २०२६ मध्ये आतापर्यंत चार बालकांचा अपघाती घटनांमुळे मृत्यू झाल्याची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी केली आहे.

दोन वर्षांतील नाशकातील घटना

६ फेब्रुवारी २०२५ : जेलरोडच्या कॅनॉलरोड भागात आईच्या कडेवरील दीड वर्षीय ओरान मुसा शेख याने चहाच्या पातेल्याला हात लावल्याने उकळता चहा अंगावर सांडला. त्यात त्याचा मृत्यू

२७ फेब्रुवारी २०२५ : उपनगरच्या खर्जुल मळा भागात पाणी साचविण्याच्या डबक्यात बुडून दोन वर्षीय प्रांजल लहू माने (रा. विजयनगर) या बालिकेचा मृत्यू

१० मार्च २०२५ : दिंडोरी रस्त्यावरील शिंदे वस्तीत दोन वर्षीय आदित्य नवनाथ शिंदे याने डास मारण्याचे औषध (लिक्विड रिफिल) प्यायल्याने उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू

२२ मार्च २०२५ : अंबड ‘एमआयडीसी’त घराजवळ पाण्यात खेळताना तोल जाऊन बादलीत पडल्याने चार वर्षीय रागनी मनोजकुमार वनवासी या बालिकेचा मृत्यू

Maharashtra TimesGulabrao Patil : मी 6 महिन्यांचा असताना आई गेली, गल्लीतल्या बायका ती कशी दिसायची सांगायच्या, पण आयुष्यभर शोधूनही तिचा फोटो सापडला नाही, गुलाबराव पाटलांची हळवी आठवण६ एप्रिल २०२५ : निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून अठरा महिन्यांच्या रौनक सुनील कनोजे (जेलरोड) याचा मृत्यू

१६ मे २०२५ : केवल पार्क भागात उकळत्या पाण्यात पडून सव्वावर्षीय आयुष अविनाश पावरा याचा उपचारांदरम्यान मृत्यू

८ ऑक्टोबर २०२५ : अश्विननगर भागात कार्तिक विलास घुगे याचा चुकून गरम पाण्याच्या पातेल्यात बसल्याने मृत्यू

१८ फेब्रुवारी २०२६ : सातपूर कॉलनीतील कामगार भवनजवळील जुनी संरक्षक भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून अडीच वर्षीय मोहम्मद जुबेर खान (सातपूर कॉलनी) या बालकाचा मृत्यू

Maharashtra TimesCrime News : मुलाचा प्रायव्हेट पार्ट आणून द्या, 1.2 कोटी देतो; आमिषाला भुलून चौघांनी मित्राला संपवलं, टॅटूमुळे थरारक उलगडा२२ मे २०२६ : घरात खेळताना बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत वाकून पाहताना तोल गेल्याने बादलीत पडून एक वर्षीय हिंदवी दत्तात्रय भोसले (आडगाव फाटा) या बालिकेचा मृत्यू

१५ ऑगस्ट २०२६: आठ वर्षीय तृप्ती विशाल सोनवणे आणि चार वर्षीय स्वस्ति सोनवणे या दोन्ही बहिणींचा स्वयंपाकघरामागील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत