Nashik Ashok Kharat Case Rupali Chakankar files case with Pune Cyber Police Crime News; अशोक खरात प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट-कमेंट्स, रुपाली चाकणकरांना मानसिक त्रास, पुणे सायबर पोलिसात गुन्हा
Nashik Ashok Kharat Case Rupali Chakankar files case with Pune Cyber Police Crime News; अशोक खरात प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट-कमेंट्स, रुपाली चाकणकरांना मानसिक त्रास, पुणे सायबर पोलिसात गुन्हा
Pune News : नाशिकमधील अशोक खरात याच्यावरील महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती.
अशोक खरात-रुपाली चाकणकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मिलिंद मारुती गोरे आणि सपना नंदकिशोर राऊत यांच्यासह इतरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अन्य व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७५ (१) (४), ७८, ७९, ३५३ (२), ३५६ (२), ४५, ४९, ३ (५); तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.
नाशिकमधील अशोक खरात याच्यावरील महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण गाजले होते. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांच्या सोशल मीडियावर टीका करण्यात आली. काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. चाकणकर यांच्या तक्रारीनुसार, रूपाली पाटील-ठोंबरे, सुषमा अंधारे, संगीता तिवारी, ॲड. अशोक बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री समींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिद्धान्त, योगेश सावंत, दीपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे आणि मोहसीन शेख यांनी चाकणकर यांच्याविरोधात पोस्ट केल्या होत्या.
पोस्टवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप
या पोस्टवर मिलिंद गोरे, सपना राऊत आणि इतरांनी अश्लील, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप चाकणकर यांनी तक्रारीत केला आहे. संबंधित पोस्ट आणि त्यावरील कमेंट्समधून खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याने आपली बदनामी झाली. मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
अशोक खरात प्रकरणाच्या संदर्भात चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अन्य व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा