Headlines

Nashik Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना – sinner couple died after speeding truck rammed into their two-wheeler on nashik-pune highway


Nashik Accident News:नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पाटोळे येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

nashik accident news
नाशिक अपघात बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: नाशिक – पुणे महामार्गावरील मोहदरी शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पाटोळे येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला. दत्तू पुंडलीक नागरे (वय ५६) आणि वंदना दत्तू नागरे (५०) अशी मृतांची नावे असून, अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तू नागरे आणि वंदना नागरे हे ११ जून रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजता दुचाकीवरून नाशिकहून सिन्नरकडे येत होते. मोहदरी येथील पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

Maharashtra TimesNashik Crime: पाळीव श्वानावर अज्ञाताकडून विषप्रयोग; श्वान दगावल्याने कुटुंबीय व्याकूळ, अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल
अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला. मृत दाम्पत्याचा मुलगा ऋषिकेश नागरे (२५) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक मनोजकुमार प्रद्युम्न यादव (रा. बिरवा, ता. रुद्रपूर, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra TimesNashik Crime: अठरा लाखांच्या खंडणीसाठी सीएचे अपहरण; इगतपुरीला लॉजवर डांबून ठेवत मारहाण, घटनेनं खळबळ
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावर मंगरूळ टोल शेजारी कारच्या धडकेत मालेगाव येथील शेख सुलतान शेख हुसेन (वय ४२) यांचा मृत्यू झाला. तवेरा कारने (एमएच १५ बीएक्स ३३५३) दुचाकीला (एमएच ४१ झेड ७६४७) पाठीमागून जोरदार धडक देत ५० ते ६० फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार हुसेन यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ शेख इरफान शेख हुसेन यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार कारचालक गणेश लक्ष्मण देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अडाण नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू
अधिक मासानिमित्त गोमेश्वर संस्थानजवळील अडाण नदीवर रविवारी आंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. दर्शन वावगे आणि शुभम धांडे अशी मृतांची नावे असून हे दोघेही आते आणि मामेभाऊ होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि अधिक मास असल्याने शुभम आणि दर्शन हे दोघे गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात गेले होते. पोहता पोहता नदीच्या पात्रात असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. काठावर असलेल्या लहान मुलांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोवर दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा