Nashik Accident News:नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पाटोळे येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तू नागरे आणि वंदना नागरे हे ११ जून रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजता दुचाकीवरून नाशिकहून सिन्नरकडे येत होते. मोहदरी येथील पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
Nashik Crime: पाळीव श्वानावर अज्ञाताकडून विषप्रयोग; श्वान दगावल्याने कुटुंबीय व्याकूळ, अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल
अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला. मृत दाम्पत्याचा मुलगा ऋषिकेश नागरे (२५) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक मनोजकुमार प्रद्युम्न यादव (रा. बिरवा, ता. रुद्रपूर, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Nashik Crime: अठरा लाखांच्या खंडणीसाठी सीएचे अपहरण; इगतपुरीला लॉजवर डांबून ठेवत मारहाण, घटनेनं खळबळ
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावर मंगरूळ टोल शेजारी कारच्या धडकेत मालेगाव येथील शेख सुलतान शेख हुसेन (वय ४२) यांचा मृत्यू झाला. तवेरा कारने (एमएच १५ बीएक्स ३३५३) दुचाकीला (एमएच ४१ झेड ७६४७) पाठीमागून जोरदार धडक देत ५० ते ६० फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार हुसेन यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ शेख इरफान शेख हुसेन यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार कारचालक गणेश लक्ष्मण देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अडाण नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू
अधिक मासानिमित्त गोमेश्वर संस्थानजवळील अडाण नदीवर रविवारी आंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. दर्शन वावगे आणि शुभम धांडे अशी मृतांची नावे असून हे दोघेही आते आणि मामेभाऊ होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि अधिक मास असल्याने शुभम आणि दर्शन हे दोघे गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात गेले होते. पोहता पोहता नदीच्या पात्रात असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. काठावर असलेल्या लहान मुलांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोवर दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.

