Headlines

Nandurbar Crime : घोर कलियुग! 17 वर्षाच्या मुलीची प्रसुती, नऊ महिन्यांनी समजलं की, घरातले शेतात गेल्यावर… महाराष्ट्र हादरवणारी घटना – nandurbar crime younger sister physically assault by older brother


Nandurbar Crime News : महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची प्रसुती झाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

Nandurbar Crime
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे एक धक्कादायक घटना उघड झाली. अल्पवयीन युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संबंधित पीडित युवतीने एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर वैद्यकीय तपासणी आणि चौकशीदरम्यान तब्बल नऊ महिन्यांपूर्वी सख्ख्या भावाकडूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

रुग्णालय प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. त्यानुसार म्हसावद पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडितेचा जबाब नोंदविला. त्यानंतर म्हसावद पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नातेसंबंधांना काळिमा फासणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेलेले होते. त्यामुळे घरामध्ये पीडित अल्पवयीन युवती आणि तिचा भाऊ हे दोघे होते.
Maharashtra TimesLadki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 710 पुरुषांचे अर्ज; एका चुकीने बिंग फुटलं, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार
जीवे ठार मारण्याची धमकी देत भावानेच आपल्या १७ वर्षीय बहिणीवर अत्याचार केला. त्यानंतर देखील त्याने वेळोवेळी सदर युवतीवर अत्याचार केला. ही घटना जुन २०२५ मध्ये घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी सख्ख्या भावाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४ (२) (एफ) (एम), ३५१ (२) (३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत कलम ४, ५ (जे) (२), ५ (एल), ५ (एन), ६, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यामुळे आरोपीस कठोर शिक्षेची तरतूद आहे.
Maharashtra TimesNandurbar Crime: नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश; पालिका कर्मचाऱ्यासह 5 जण अटकेत
दरम्यान, गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी म्हसावद पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली असून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुलीला वैद्यकीय व समुपदेशनाची मदत देण्याबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेने समाजमन हेलावून गेले असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा