Nandurbar 29 Years old Married Woman Bhagyashree Chaudhari ends life Crime News; 29 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, पती आणि प्रेयसीवर गुन्हा, भाग्यश्रीने वारंवार समाजवूनही…
Nandurbar 29 Years old Married Woman Bhagyashree Chaudhari ends life Crime News; 29 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, पती आणि प्रेयसीवर गुन्हा, भाग्यश्रीने वारंवार समाजवूनही…
Nandurbar Woman ends life : भाग्यश्रीने गौरव आणि त्याची कथित प्रेयसी या दोघांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : शहादा शहरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती तसेच त्याच्या प्रेयसी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील रमकूबाईनगर परिसरात भाग्यश्री गौरव चौधरी (२९) या विवाहितेचे गौरव चौधरी याच्याशी लग्न झाले. 2015 पासून ते 2026 पर्यंत भाग्यश्रीला तिचा पती मानसिक त्रास देऊन मारहाणही करत असल्याचा आरोप आहे. त्याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते.
भाग्यश्रीने गौरव आणि त्याची कथित प्रेयसी या दोघांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यांच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता. उलट तिचा पती तिला जास्त मानसिक व शारीरिक त्रास देऊन मारहाण करत होता. माहेरील कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीची तिला जाणीव होती. त्यामुळे भाग्यश्री निमूटपणे सर्व त्रास सहन करत होती. तिच्यावर होणारा अन्याय सांगितला नाही. Crime News : रात्री घरात घुसून मिठी मारली, विरोध केल्याने 34 वर्षीय तरुणीचा जीव घेतला; आग लावून दिशाभूल, अखेर 18 वर्षीय तरुण अटक भाग्यश्री पती आणि त्याच्या प्रेयसीला समजावत होती. परंतु त्यांच्यात बदल होत नसल्याने त्यांच्या नेहमीच्या त्रासाला व जाचाला कंटाळून तिने 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास राहत्या घरी बेडरुममधील सीलिंग फॅनला कापडी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणी मयत भाग्यश्री यांच्या आई संगीता चौधरी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात पती गौरवकुमार चौधरी आणि त्याच्या प्रेयसी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गौरवकुमार चौधरी याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर संबंधित महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिला कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
गिरिजा ओकचे किस्सेच संपेना, रमली जुन्या आठवणीत
गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
दुसरीकडे, वडगाव कोल्हाटी येथिल एका सत्तावीस वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडीस आली. Bengaluru Crime : बायकोने ज्याच्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली, त्या नवऱ्याचेच बंद खोलीत प्रेयसीशी चाळे, रंगेहाथ पकडलं अन्… पल्लवी मदन जगताप (वय २७) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. या विषयी माहिती अशी की ‘मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पल्लवी जगताप हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पल्लवी जगताप या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पल्लवीने आत्महत्या केली नसून घातपाताची शक्यता आहे. या घटनेला तिचे सासरचे नातेवाइक आणि नवरा जबाबदार असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा