Nanded SBI Bank Officer Aditya Sengawar Dies in Rajasthan After Gold Theft; SBI मधील 85 लाखांचा सोन्याचा अपहार, बँकेतील अधिकाऱ्यांनीच केला कारनामा; फरार अधिकाऱ्यासोबत राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकार
Nanded SBI Bank Officer Aditya Sengawar Dies in Rajasthan After Gold Theft; SBI मधील 85 लाखांचा सोन्याचा अपहार, बँकेतील अधिकाऱ्यांनीच केला कारनामा; फरार अधिकाऱ्यासोबत राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकार
Nanded SBI Bank Gold Theft Accused Dies : नांदेड जिल्ह्यातील एसबीआय बँकेत सोन्याचा अपहार करणाऱ्या बँकेतीलच अधिकाऱ्याचा राजस्थानमध्ये मृत्यू झाला आहे.
नांदेड एसबीआय बँक अधिकाऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : 15 दिवसांपूर्वी वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एसबीआय बँकेतील 80 तोळे सोन्याच्या दागिनाच्या अपहार प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बँकेचा व्यवस्थापक तथा कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर याचा राजस्थानमध्ये निधन झाल्याची माहिती आहे. याबाबत नांदेड पोलिसांनी दुजोरा देखील दिला आहे. कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेल्या ग्राहकांच्या 85 लाख रुपयाच्या सोन्याच्या दागिन्यांवर दोन अधिकाऱ्यांनी डल्ला मारला होता. शेयर मार्केटच्या नादात मयत आणि अन्य एका अधिकाऱ्याने हा कांड केला. दरम्यान फरार मुख्य आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने विविध चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शहरातील डॉक्टर लेन परिसरात एसबीआय बँकेची शाखा आहे. मुख्य आरोपी आदित्य सेनगावकर आणि जीवन जगदाळे हे व्यवस्थापक पदी कार्यरत होते. शेकडो ग्राहकांनी बँकेत सोनं तारण ठेवून कर्ज घेतलं होतं. मागील एक वर्षात सेनगावकर आणि जगदाळे या दोघांनी आपल्या पदाचा फायदा घेत आणि पैशांच्या लालचेत येऊन बँकेत ठेवलेले 80 तोळे सोनं काढून घेतलं. विशेष म्हणजे आरोपींनी काही सोनं विकले तर काही सोनं इतर बँकेत तारण ठेवून लाखो रुपयाचं कर्ज घेतलं. या दोन्ही आरोपंनी जवळपास 85 लाख 81 हजार रुपयांचा अपहार केला होता. धक्कादायक म्हणजे कोणाला माहिती होऊ नये म्हणून आरोपींनी 40 तोळे नकली सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं. ऑडिट दरम्यान हा कारनामा समोर आल्यानंतर वाजीराबाद पोलीस ठाण्यात दोघांविरोधात 29 मे रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी जीवन जगदाळे याला तात्काळ ताब्यात घेतलं, तर आदित्य सेनगावकर हा फरार होता. Sanjay Raut: सत्ताधाऱ्यांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवण्याचं कारस्थान; संजय राऊतांचा घणाघात
शेयर मार्केटचा नाद नडला
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सेनगावकर याचे झटपट पैसे कामविण्याचं स्वप्न होतं. याच दरम्यान त्याला शेयर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा नाद लागला. पैसे गुंतवण्यासाठी पैसे नसल्यानं त्याने शक्कल लढवली आणि ग्राहकांनी बँकेत कर्जासाठी तारण ठेवलेल्या सोन्यावर डल्ला मारण्याचा प्लॅन केला. जवळपास 80 तोळे सोनं काढून घेतलं आणि 40 तोळे नकली सोनं लॉकरमध्ये ठेवलं. दरम्यान, 80 तोळे सोन्यातून आलेला पैसा शेयर मार्केटमध्ये गुंतवला, पण यात त्यांना मोठा फटका बसला. Vidhan Parishad Nivadnuk : साताऱ्यात रंगतदार घडामोडी, महायुतीच्या बैठकीला शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी
आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकर हा प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच फरार झाला होता. 19 मे रोजी त्याची पत्नीने वजीराबाद पोलीस ठाणे गाठत मिसिंग तक्रार देखील दाखल केली होती. अटक टाळण्यासाठी तो विविध राज्यात प्रवास करत होता. याच दरम्यान काल शनिवारी आदित्य सेनगावकर याच्या मृत्यूची बातमी धडकली. राजस्थान येथील भरतपूर जिल्ह्यात तो वास्तव्यास होता. छातीत दुखत असल्यानं त्याला भरतपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेथील पोलिसांनी ओळख पटवून नांदेड पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान, चोरीस गेलेल्या सोन्याचं काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा