Nanded Police Inspector Santosh Kendre : या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच नाव चर्चेत आलं आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केंद्रे यांनी तत्काळ हल्लेखोराला रोखलं. या झटापटीत बोटाला घाव लागल्यानं ते किरकोळ जखमी झाले. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि तत्परतेमुळे मोठी घटना टळली.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच नाव चर्चेत आलं आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केंद्रे यांनी तत्काळ हल्लेखोराला रोखलं. या झटापटीत बोटाला घाव लागल्यानं ते किरकोळ जखमी झाले. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि तत्परतेमुळे मोठी घटना टळली. पोलीस अधिकाऱ्याच्या या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, खासदार हरसीमरत कौर बादल यांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय आभार मानत बक्षीस देण्याचं सांगितलं, पण संतोष केंद्रे यांनी ‘माझं कर्तव्य आहे’, असं म्हणत बक्षीस नाकारलं आणि मनाचा मोठेपणा दाखवला.
कोण आहेत संतोष केंद्रे?
विशेष सुरक्षा दलात पोलीस निरीक्षक पदावर असलेले संतोष केंद्रे यांचा अतिशय खडसर आणि संघर्षमय प्रवास राहिला आहे. मूळ लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील ‘कुणकी’ गावातील रहिवासीआहेत. 2001 मध्ये हिंगोली येथे पोलीस कर्मचारी (कॉन्स्टेबल) म्हणून संतोष केंद्रे हे भरती झाले. त्यानंतर 2006 मध्ये MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2009 मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली. त्यानंतर 2009-2010 मध्ये नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत त्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संतोष केंद्रे पहिली पोस्टिंग 2010 मध्ये PSI म्हणून नागपूर शहर पोलीस दलात झाली. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवायांसाठी अत्यंत उच्च प्रशिक्षित समजल्या जाणाऱ्या ‘फोर्स वन’ या महाराष्ट्राच्या विशेष दलात ते मुंबईत रुजू झाले. 2023 मध्ये केंद्रे यांना पदोन्नती मिळाली. त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य निभावले. त्यानंतर नांदेडमध्ये बदली झाल्यांतर ते विशेष सुरक्षा दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
नेमकी काय घडलं होतं?
माजी उपमुख्यमंत्री असलेले सुखबीरसिंग बादल हे पंजाब राज्यातील एक मात्तब्बर नेते म्हणून ओळखले जातात. शिरोमणी अकाली दलाचे ते प्रमुख आहेत. त्यांची पत्नी हरसीमरत कौर बादल खासदार आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी बुधवार सुखबीरसिंघ बादल हे आपल्या कुटुंबियांसह नांदेड दौऱ्यावर आले होते. सचखंड गुरुद्वारामध्ये बादल कुटुंबियाकडून अखंड पाठाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Nagpur News : ‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप नेते अन् कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाणांकडून थेट कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?
काल गुरुवारी दुपारी शहरापासून 15 किलोमीटर दूर असलेल्या मातासाहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी ते गेले होते. दर्शन करून परत येताना जसपालसिंघ नामक निहंगसिंगने खंजरने त्यांच्यावर हल्ला केला. झेड प्लस सुरक्षा असताना देखील हल्लेखोरांना सुरक्षा भेदत त्याने हल्ला केला. या घटनेनंतर गोधळ आणि धावपळ उडाली. मात्र, तिथे सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी हल्लेखोराला रोखलं आणि हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात यश मिळवलं. या प्रकरणी मुदखेड पोलिसांनी आरोपी जसपालसिंघ याला ताब्यात घेतलं आहे. सत्तेत असताना काम योग्य न केल्यामुळे तसेच नशेच्या प्रकारला न रोखल्यामुळे हल्ला केल्याचा प्राथमिक जवाब हल्लेखोरानं पोलिसांना दिल्याची माहिती आहे. या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयानं 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

