Headlines

Nanded : भाजप कार्यकर्त्यांना शाही मेजवानी, चित्रा वाघ यांना विचारताच आयोजकांना पुढे केलं – chitra wagh on bjp nanded camp violates pm modi appeal of fuel saving



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन, खाद्यतेल वापरतांना काटकसर करावी, गरज असल्यासच इंधन वापरावे वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र पंतप्रधानांच्या या आवाहणाला भारतीय जनता पक्षानेच हरताळ फासल्याचे समोर आलंय. नांदेडमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय दोन दिवसीय महानगर प्रशिक्षण अभियान घेण्यात आले. हा प्रशिक्षण अभियान कार्यक्रम अत्यंत महागड्या वाताणुकुलीत हॉल मध्ये घेण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांसाठी जेवणाची शाही मेजवानी देण्यात आली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशात प्रतिसाद मिळत असतांना दुसरीकडे नांदेड भाजपच्या वतीने मोदींच्या या अवाहणाला हरताळ फासले गेल्याचे चित्र पहायला मिळाले. यावर भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना विचारला असता मी आणखीन जेवले नाहीये याबाबत भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर चांगलं सांगू शकतील असं म्हणत कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत