Nakul Ghanekar Exclusive : ‘ठरलं तर मग’ फेम नकुल घाणेकरनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नृत्य क्षेत्रातील करिअरबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्याला लहानपणापासून नृत्याची आवड होती. इयत्ता दुसरीत असल्यापासून त्यानं कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. नातेवाईकांनी अभिनेत्याला आणि त्याच्या घरच्यांना टोमणेही मारले. मात्र, न डगमगता आज अभिनयक्षेत्रासोबतच नृत्यक्षेत्रातही नकुलनं नाव कमावलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता नकुल घाणेकरनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ ठरलं तर मग ‘ या मालिकेमध्ये सचिनची खलनायकाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अभिनेता असण्यासोबतच नकुलनं कथ्थकचं प्रशिक्षणही घेतलं आहे. नातेवाईकांचे टोमणे सहन करून न डगमगता नृत्यक्षेत्रातही नकुलनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बालपणापासूनच नकुलला नृत्याची आवड होती. मात्र, त्याला कायम हिणवलं जायचं. याबद्दल अभिनेत्यानं ‘महाराष्ट्र टाइम्स’ ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये आहे.
नातेवाईकांनी हिणवलं तरी नाही मानली हार
मुलाखतीदरम्यान नकुल घाणेकर म्हणाला की, ‘माझी आई गायिका होती, त्यामुळे आमच्या घरात सतत गाणी लावली जायची. त्यामुळे मी घरीच डान्स करायचो. मी दोन-अडीज वर्षांपासून डान्स करायला लागलो. त्यावेळी माझ्या बाबांना त्यांच्या एका मित्राने सांगितलं की, तुमच्या मुलाला कथ्थकचं प्रशिक्षण द्या. कारण तो जो डान्स करतोय, तो साधा प्रकार नाहीये. तुमच्या मुलामध्ये काहीतरी कलागुण आहेत.’
Zee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना नकुल पुढे म्हणाला की, ‘माझे बाबा वैज्ञानिक होते, त्यामुळे ते पुढारलेल्या विचारांचे होते. त्यावेळी बाबांना कुटुंबीयांचा खूप विरोध पत्करावा लागला. नातेवाईक वडिलांना खूप बोलायचे. पायात घुंगरू घातल्यावर लोक चिडवायचे. पण, माझे बाबा कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. मी डावरा आहे. तेव्हा तर मारून-मारून उजवं करायचे. मी देवाचा प्रसाद पण डाव्या हाताने घ्यायचो. त्यावरूनही मला हिणवलं गेलं. मात्र, माझे बाबा कायम माझ्या बाजूने असायचे. ते म्हणायचे, ‘नाही द्यायचा प्रसाद नका देऊ, असं नाही वागायचं.’
नकुलनं काही वर्ष कथ्थकचं प्रशिक्षण बंद केलं होतं. मात्र, त्यानंतर अभिनेता पुन्हा नृत्याकडे वळला. नकुल, सोनिया परचुरे यांच्याकडे नृत्याचं प्रशिक्षण घेतोय. मुलाखतीदरम्यान, सोनिया यांच्याबद्दल बोलताना नकुल म्हणाला की, ‘मी २० वर्षांपेक्षा जास्त वर्ष सोनिया परचुरे यांच्याकडे कथ्थकचं प्रशिक्षण घेतोय. आम्ही अजूनही सोनियाकडे शिकायला जातो. सोनिया हे आमच्यासाठी खूप मोठं नाव आहे. माझ्या नृत्याच्या प्रत्येक वाटचालीचं श्रेय सोनियाला आहे.’
मुलाखतीदरम्यान नकुलला पहिल्या कमाईबद्दल विचारलं असता अभिनेता म्हणाला की, ‘मी सातवीत असताना आमच्याच इथे बंगला आहे. त्या बंगल्यात विठ्ठलाचं मंदिर आहे. तेव्हा भजनी मंडळाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी नृत्य करशील का असं मला विचारलं? तेव्हा मला त्यांनी ४० रुपये दिले. ते पैसे माझ्यासाठी खूप होते.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा