Headlines

Nakul Ghanekar : पायात घुंगरू घातल्यावर लोक चिडवायचे, डावरा असल्यामुळे हिणवायचे, पण बाबांनी सोडली नाही साथ; ‘ठरलं तर मग’ फेम सचिननं सांगितला कठीण काळ


Nakul Ghanekar Exclusive : ‘ठरलं तर मग’ फेम नकुल घाणेकरनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नृत्य क्षेत्रातील करिअरबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्याला लहानपणापासून नृत्याची आवड होती. इयत्ता दुसरीत असल्यापासून त्यानं कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. नातेवाईकांनी अभिनेत्याला आणि त्याच्या घरच्यांना टोमणेही मारले. मात्र, न डगमगता आज अभिनयक्षेत्रासोबतच नृत्यक्षेत्रातही नकुलनं नाव कमावलं आहे.

Nakul Ghanekar On Kathak
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता नकुल घाणेकरनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ ठरलं तर मग ‘ या मालिकेमध्ये सचिनची खलनायकाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अभिनेता असण्यासोबतच नकुलनं कथ्थकचं प्रशिक्षणही घेतलं आहे. नातेवाईकांचे टोमणे सहन करून न डगमगता नृत्यक्षेत्रातही नकुलनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बालपणापासूनच नकुलला नृत्याची आवड होती. मात्र, त्याला कायम हिणवलं जायचं. याबद्दल अभिनेत्यानं ‘महाराष्ट्र टाइम्स’ ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये आहे.

नातेवाईकांनी हिणवलं तरी नाही मानली हार

मुलाखतीदरम्यान नकुल घाणेकर म्हणाला की, ‘माझी आई गायिका होती, त्यामुळे आमच्या घरात सतत गाणी लावली जायची. त्यामुळे मी घरीच डान्स करायचो. मी दोन-अडीज वर्षांपासून डान्स करायला लागलो. त्यावेळी माझ्या बाबांना त्यांच्या एका मित्राने सांगितलं की, तुमच्या मुलाला कथ्थकचं प्रशिक्षण द्या. कारण तो जो डान्स करतोय, तो साधा प्रकार नाहीये. तुमच्या मुलामध्ये काहीतरी कलागुण आहेत.’

Maharashtra TimesZee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
नकुल पुढे म्हणाला की, ‘माझे बाबा वैज्ञानिक होते, त्यामुळे ते पुढारलेल्या विचारांचे होते. त्यावेळी बाबांना कुटुंबीयांचा खूप विरोध पत्करावा लागला. नातेवाईक वडिलांना खूप बोलायचे. पायात घुंगरू घातल्यावर लोक चिडवायचे. पण, माझे बाबा कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. मी डावरा आहे. तेव्हा तर मारून-मारून उजवं करायचे. मी देवाचा प्रसाद पण डाव्या हाताने घ्यायचो. त्यावरूनही मला हिणवलं गेलं. मात्र, माझे बाबा कायम माझ्या बाजूने असायचे. ते म्हणायचे, ‘नाही द्यायचा प्रसाद नका देऊ, असं नाही वागायचं.’

नकुलनं काही वर्ष कथ्थकचं प्रशिक्षण बंद केलं होतं. मात्र, त्यानंतर अभिनेता पुन्हा नृत्याकडे वळला. नकुल, सोनिया परचुरे यांच्याकडे नृत्याचं प्रशिक्षण घेतोय. मुलाखतीदरम्यान, सोनिया यांच्याबद्दल बोलताना नकुल म्हणाला की, ‘मी २० वर्षांपेक्षा जास्त वर्ष सोनिया परचुरे यांच्याकडे कथ्थकचं प्रशिक्षण घेतोय. आम्ही अजूनही सोनियाकडे शिकायला जातो. सोनिया हे आमच्यासाठी खूप मोठं नाव आहे. माझ्या नृत्याच्या प्रत्येक वाटचालीचं श्रेय सोनियाला आहे.’

Maharashtra TimesVishal Aditya Singh : 7 वर्षांनी मोठ्या श्वेता तिवारीसोबत अफेअरच्या चर्चा, लोकप्रिय अभिनेत्यानं सोडलं मौन; काय म्हणाला?

नकुल घाणेकरची पहिली कमाई

मुलाखतीदरम्यान नकुलला पहिल्या कमाईबद्दल विचारलं असता अभिनेता म्हणाला की, ‘मी सातवीत असताना आमच्याच इथे बंगला आहे. त्या बंगल्यात विठ्ठलाचं मंदिर आहे. तेव्हा भजनी मंडळाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी नृत्य करशील का असं मला विचारलं? तेव्हा मला त्यांनी ४० रुपये दिले. ते पैसे माझ्यासाठी खूप होते.’

Maharashtra TimesMini Mathur : ‘माझ्या सासरचे लोक धार्मिक नव्हते’, मुस्लीम दिग्दर्शकासोबत लग्न, आंतरधर्मीय विवाहाबद्दल स्पष्टच बोलली लोकप्रिय अभिनेत्री
दरम्यान, नकुल घाणेकरच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं ‘अजूनही चांद रात आहे’, ‘गाथा नवनाथांची’, ‘स्वाभिमान’, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.