Nagpur Symbiosis College Young Accused Out on Bail and Killed in Forest; दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलं
Nagpur Symbiosis College Young Accused Out on Bail and Killed in Forest; दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलं
Nagpur Symbiosis College Youth Killed : खुनाच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून आणि चाकूने वार करून हत्या करण्यात आली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बॉयसिस विद्यापीठामागील परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
नागपूर सिंबॉयसिस कॉलेज तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : एका हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या आणि सुमारे दोन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या 20 वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. सिंबॉयसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरातील झुडुपांमध्ये काल शुक्रवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृतकाची ओळख प्रतीक राजू करांडेकर (वय 20) अशी झाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक याच्याविरुद्ध 2025 मध्ये एचबी टाऊन परिसरात झालेल्या एकाहत्या प्रकरणात गुन्हा दाखलकरण्यात आला होता. या प्रकरणात प्रतीकला त्याच्या तीन साथीदारांसह अटक करण्यात आली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी प्रतीक आपल्या अन्य दोन साथीदारांसह जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रतीक मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडला होता. काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचं त्याने कुटुंबीयांना सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. काल शुक्रवारी सकाळी सिंबॉयसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.
प्राथमिक तपासात प्रतीक रात्री काही जणांसोबत याच परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सर्वांनी एकत्रितपणे मद्यपान केल्याचंही तपासात समोर आलं आहे. मद्यपान करताना कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्यानंतर प्रतीकच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, आरोपी आणि मृतक यांच्यात पूर्वीपासून काही वाद किंवा वैमनस्य होतं का, तसेच या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या प्रकरणाचा तपास वाठोडा पोलीस करत असून घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड तसेच संशयितांच्या चौकशीतून हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा