Headlines

Nagpur Nandanvan Somras Bar Big Criminal Akshay Vanjari Killed Putting Chilli Powder his Eyes; बारमध्ये मित्रांसोबत दारु प्यायला बसलेला, पत्नीचा फोन येताच बाहेर आला अन् तिथेच घात झाला; कुख्यात गुंडाला प्लॅन करुन संपवलं


Nagpur Crime News : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुख्यात गुंड तथा गुन्हेगार अक्षय वंजारीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime News
नागपूर सोमरस बार अक्षय वंजारी हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या नंदनवन परिसरात पुन्हा एकदा गँगवॉरची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत बिअर बारमध्ये बसलेल्या कुख्यात गुन्हेगार अक्षय वंजारीवर बारबाहेर येताच डोळ्यांत मिरची पावडर फेकून चाकू आणि लोखंडी हत्यारांनी हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान 26 ऑगस्ट बुधवारी रोजी मृत्यू झाला. आदल्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट मंगळवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली.

पत्नीचा फोन आला अन् घात झाला

25 ऑगस्ट मंगळवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अक्षय वंजारी हा काही मित्रांसोबत नंदनवन परिसरातील सोमरस बारमध्ये बसला होता. याचदरम्यान त्याला पत्नीचा फोन आला. फोन आल्यानंतर तो बारमधून बाहेर आला. मात्र, तो बाहेर येण्याची वाट पाहत असलेल्या हल्लेखोरांनी त्याचावर हल्ला चढवला. अक्षय बारच्या बाहेर येताच वंदना लांजेवार या महिलेनं त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली. डोळ्यांत मिरची पावडर गेल्यानं अक्षयला काहीच दिसत नव्हतं. याच संधीचा फायदा घेत प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार आणि त्यांच्या साथीदारांनी अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी अक्षयने तेथून पळ काढत पुन्हा बारच्या वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. बारमध्ये पोहोचल्यानंतर त्याने मित्रांना बाहेर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे मित्रही खाली आले. मात्र, हल्लेखोरांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला.

Maharashtra TimesPune News: राहुल गांधी इफेक्ट? देवेंद्र फडणवीसांसहित संपूर्ण भाजप पुण्यात येणार, हाय व्होल्टेज बैठक, प्लॅन काय?

लोखंडी हत्याराने अक्षयवर हल्ला

यावेळी प्रदीप आखरे याने लोखंडी हत्याराने अक्षयवर हल्ला केल्याचा आरोप आहे. तर प्रशांत आखरे आणि सूरज लांजेवार यांनी चाकूने त्याच्यावर वार केले. इतर आरोपींनीही अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अक्षयवर हल्ला होत असल्याचं पाहून त्याचा मित्र अश्विन रहांगडाले याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी अश्विनवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अक्षय गंभीर जखमी झाल्यानंतर अश्विनने त्याला दुचाकीवरून तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान बुधवारी 26 ऑगस्ट रोजी अक्षयचा मृत्यू झाला.

हेरगिरीच्या संशयातून हल्ला?

अक्षय वंजारीच्या हत्येमागे हेरगिरीचा संशय असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी सूरज लांजेवारचा भाऊ आकाश याला चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. या अटकेमागे अक्षय वंजारीने पोलिसांना माहिती दिल्याचा सूरजला संशय होता. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादातून अक्षयला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूरज लांजेवार, सूरजची आई वंदना लांजेवार, प्रशांत आखरे आणि हार्दिक पालनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रदीप आखरेसह आणखी तीन आरोपी फरार आहेत. तर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Maharashtra TimesSanjana Agarwal : खूप गिल्टी वाटतंय, रक्षाबंधनाला केतनच्या आठवणीत संजनाला अश्रू अनावर, सियाला मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटचं कारण सांगितलं
मृतक अक्षय वंजारी याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे नंदनवन परिसरातील या हत्याकांडामुळे नागपुरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण आणि हत्येचा कट कधीपासून रचला होता? याचा नंदनवन पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा