Headlines

Nagpur Crime: ‘लव्ह ट्रँगल’चा भयानक शेवट; एकाला निर्घृणपणे संपवलं, दोन आरोपी अटकेत, टीपू सुलतान चौकाजवळील घटना – nagpur 22 yrs old young man died in love triangle near tipu sultan chowk


Nagpur Crime: ​गंभीर जखमी झालेल्या सलमानला मित्रांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रथम खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

crime
नागपूर क्राईम बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाची परिणती तरुणाच्या हत्येत झाली. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टीपू सुलतान चौकाजवळ मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. सलमान अशफाक अन्सारी (वय २२, रा. संघर्षनगर) असे मृताचे नाव असून मुज्जमिल उर्फ मुज्जू हसन अली (वय २०, रा. गांजाखेत) आणि त्याचा साथीदार साहील मलिक (वय १९, रा. चारखंबा, पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सलमान हा मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टीपू सुलतान चौकाजवळील शिवाजी चौक रोडवर उभा राहून मोबाइलवर बोलत होता. यावेळी आरोपी मुज्जमिल आणि साहील हे दुचाकीवरून तेथे पोहोचले. सलमान आणि मुज्जमिल यांच्यात एका युवतीशी असलेल्या प्रेमसंबंधांवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्याच वादातून दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी सलमानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या छातीवर, खांद्यावर आणि हातावर वार करण्यात आले.

Maharashtra TimesVidarbha School Reopening: शाळा 30 जूनलाच! विदर्भाबाबत उच्च न्यायालयाने खडसावले; शिक्षण विभागाचा निर्णय रद्द
घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस आणि गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मोहम्मद शोएब मोहम्मद शरीफ अन्सारी यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली.

Maharashtra TimesNagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
चोवीस तासांत जामीन
या प्रकरणातील आरोपी मुज्जमिल उर्फ मुज्जू हसन अली याला २४ तासांतच जामीन मिळाला. खुनाच्या प्रकरणात अवघ्या २४ तासांत जामीन मिळण्याची ही गेल्या नजीकच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. मुज्जूची अटक करताना त्यांना व त्याच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती व अटकेमागील कारणे पोलिसांनी सांगितलीच नाही. नियमानुसार अटकेदरम्यान ही माहिती पुरवावी लागते. ती न पुरविल्याने त्याची अटक अवैध व बेकायदेशीर ठरवित प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. डी. बिरहारी यांनी आरोपीची पोलिस कोठडी नामंजूर करीत थेट जामीन मंजूर केला. अॅड. कमल सतुजा यांनी आरोपीची बाजू मांडली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा