Headlines

Mumbai Yashwantrao Chavan Center Chief Minister Devendra Fadnavis Felicitates Ravindra Chavan; ‘CM देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे असणारे एकमेव नेतृत्व’; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं प्रतिपादन


BJP Ravindra Chavhan : पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजप किसान मोर्चाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला

Chief Minister Devendra Fadnavis Felicitates Ravindra Chavan
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरीवर्ग पूर्ण ताकदीनिशी देवाभाऊ सरकारच्या पाठीशी उभं आहे’, असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काल बुधवारी केलं.

रविंद्र चव्हाण यांनी सभागृहाला संबोधित केलं

पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजप किसान मोर्चाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी रविंद्र चव्हाण यांनी सभागृहाला संबोधित केलं. शेतरस्ते आणि पाणंद रस्ते, जलयुक्त शिवार अभियान, शेतीला मिळालेली AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड, कृषी पंपांना भर दिवसा मोफत वीज अशा फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या विविध निर्णय आणि योजनांचा यावेळी रविंद्र चव्हाण यांनी मागोवा घेतला. सरकारच्या कामगिरीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Maharashtra TimesTukaram Mundhe Action : मुंबईत दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड, तुकाराम मुंढेंनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या
या सोहळ्यादरम्यान भाजप प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे यांनी राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून आणि देवाभाऊ यांच्या नावाने जयघोष केला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याकडे केवळ एक सत्कार सोहळा म्हणून न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी म्हणून पाहत असल्याचं नमूद केलं. तसेच ‘कोणतीही राजकीय निवडणूक डोळ्यांसमोर नसताना आम्ही कर्जमुक्तीचा निर्णय घेतला, कारण शेतकऱ्यांचे हित हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. अनेकांना वाटत होतं सरकार कर्जमाफी करणार नाही. आपण आंदोलने करू… पण हे महायुतीचे सरकार आहे, शेतकऱ्यांच्या देवाभाऊचे सरकार आहे’, असंही ते म्हणाले.

शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे

७.५ अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पंपांना भर दिवसा आणि मोफत वीज देण्यात येत आहे. या पंपांसाठी असणारे ४८ हजार कोटींचे जुने वीज बिल माफ करत असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली. ‘शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला त्या पाटीवर नव्याने इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे’ असं फडणवीस यांनी सांगितलं.
Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या एफडीएची मुंबईत मोठी धाड, 11 लाखांचे टॉयलेट साबण जप्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामगिरीविषयी शेतकरी वर्गात समाधान असल्याचे या सोहळ्यात दिसून आले. या सोहळ्याला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. अनिल बोंडे, आ. रणधीर सावरकर, आ. प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आ. चित्रा वाघ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह अनेक आमदार, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र डेस्क

लेखकाबद्दलमहाराष्ट्र डेस्कमटा महाराष्ट्र डेस्क एक अनुभवी आणि जागरूक टीम आहे. ही टीम राज्य, जिल्हा, शहर आणि गाव पातळीच्या बातम्यांसह राज्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि स्थानिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवते. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या, विकास योजनांचा आढावा, स्थानिक राजकारणातील बदल आणि सांस्कृतिक घडामोडींचे तटस्थ व विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच या डेस्कचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बातमीला संदर्भासह सादर करून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे हा या टीमचा नेहमीच प्रयत्न असतो.आणखी वाचा