Mumbai SRPF Kaustubh Sangle Death after Police Constable rejects marriage proposal Crime News; कॉन्स्टेबलशी दोन वर्ष प्रेमसंबंध; 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळेसोबत काय घडलं? डायरीत मोठे खुलासे
Mumbai SRPF Kaustubh Sangle Death after Police Constable rejects marriage proposal Crime News; कॉन्स्टेबलशी दोन वर्ष प्रेमसंबंध; 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळेसोबत काय घडलं? डायरीत मोठे खुलासे
Mumbai SRPF Jawan Kaustubh Sangle Death in Lokbhavan :प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून कौस्तुभ सांगळेने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या डायरीतून स्पष्ट झाले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईतील लोकभवन येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेला एसआरपीएफचा जवान कौस्तुभ सांगळे (२६) याने प्रेमभंगातून आयुष्याची अखेर केल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून कौस्तुभ याने हे पाऊल उचलल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या डायरीतून स्पष्ट झाले आहे.
लोकभवनात कर्तव्यावर असताना टोकाचं पाऊल
मूळचा नाशिकच्या लासलगावचा रहिवासी असलेला कौस्तुभ हा एसआरपीएफच्या घटक १६ (कोल्हापूर) तुकडीत कार्यरत होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लोकभवन येथे कर्तव्य बजावताना त्याने शासकीय रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. घटनेनंतर मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयात नेमणुकीला असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलसोबत कौस्तुभ याचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांची ओळख तीन वर्षांपूर्वी पोलिस प्रशिक्षण अकादमी येथे झाली होती. नोकरीवर रुजू होताच कौस्तुभने तरुणीकडे लग्नाची मागणी केली. मात्र महिला कॉन्स्टेबलने त्याची मागणी धुडकावून लावत संवाद कमी केला. यामुळे कौस्तुभ अस्वस्थ झाला.
महिलेची तक्रार, लग्न जमल्याने धक्का
त्याने संदेश पाठवून, कॉल करून तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कौस्तुभ मागे लागल्याने तिने पोलिस ठाण्यात लेखी तक्रारही दिली होती. त्यातच दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न जमल्याचे समजल्याने त्याला धक्का बसला होता.
Imtiaz Jaleel | इम्तियाज जलीलांच्या एका कॉलने पुणे पोलिसांत उडाली खळबळ!
दुसऱ्या मजल्यावरून पडून नागपुरात तरुणीचा मृत्यू
दुसरीकडे, कपडे काढण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना सहा जुलै रोजी सायंकाळी रोशनगेट परिसरातील आझम कॉलनी येथे घडली. मृत तरुणीचे नाव अक्सा सय्यद फारुख सय्यद (वय १८) असे आहे.
या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्सा मंगळवारी (सात जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला कपडे काढण्यासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली होती. तेव्हा जिन्याच्या खिडकीतून ती अचानक खाली पडली. या घटनेत अक्सा हिच्या डोक्याला गंभीर मार लागला. गंभीर जखमी झालेल्या अक्सा हिला उपचारांसाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, अशी माहिती देण्यात आली. Nagpur Crime : लॉजमध्ये बायकोचे आक्षेपार्ह फोटो काढले, मैत्रिणीला पाठवून व्हायरल, पतीसह दोघांवर गुन्हा दरम्यान याबाबत जिन्सी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अक्सा हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत अक्सा हिचे वडील रंगकाम करतात. तिला एक बहीण (विवाहित), एक भाऊ आहे.
अक्सा नुकतीच दहावी पास झाली होती. ती पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्नात होती. या प्रकरणाचीनोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख शाहिद करित आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा