Mumbai SRA Flat Fraud 5 Crore 57 Lakhs Case Registered Against Congress MP PA; SRA फ्लॅट देण्याच्या आमिषाने 5.57 कोटी रुपये लाटले, काँग्रेस खासदारच्या पीएवर गुन्हा दाखल; मुंबईतील प्रकरण नेमकं काय?
Mumbai SRA Flat Fraud 5 Crore 57 Lakhs Case Registered Against Congress MP PA; SRA फ्लॅट देण्याच्या आमिषाने 5.57 कोटी रुपये लाटले, काँग्रेस खासदारच्या पीएवर गुन्हा दाखल; मुंबईतील प्रकरण नेमकं काय?
Mumbai SRA Flat Fraud : मुंबईत SRA अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची कथित फसवणूक झाल्याप्रकरणी एका खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसआरए फ्लॅट घोटाळा काँग्रेस खासदार पीए गुन्हा
मुंबई : मुंबईत एसआरए अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषानं तब्बल 5.57 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार आकाश राधेश्याम सोनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे 5 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी FIR दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्रभावशाली व्यक्तींशी संबंध
तक्रारीनुसार, 2017 मध्ये तक्रारदार आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते. त्याचकाळात त्यांचीशैलेश काकण आणि त्याच्या सहकाऱ्याशी ओळख झाली. त्यांनी SRA चे फ्लॅट उपलब्ध करून देण्याचा दावा केला. तसेच स्वतःचे SRA अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचं सांगून अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, कांदिवली आणि माटुंगा परिसरात फ्लॅट मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
फ्लॅट मिळवून देण्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 15 लाख ते 28 लाख रुपये सांगितले. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या कंपनीमार्फत 47 ग्राहकांकडून रक्कम गोळा करण्यात आली. विविध ग्राहकांकडून घेतलेली एकूण रक्कम 5 कोटी 57 लाख 50 हजार इतकी झाली. तक्रारीनुसार, आरोपींनी टोकन रक्कम तसेच हप्त्यांद्वारे सातत्यानं पैसे घेतले. यामध्ये चेक आणि RTGS द्वारे झालेल्या अनेक आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारदाराचा असाही आरोप आहे की, आरोपींनी SRA च्या लेटरहेडवरील कथित वाटपपत्रे, आदेशांच्या प्रती, कलेक्टरांची पत्रे, सक्षम प्राधिकरणाची पत्रे, सोसायटी NOC, वीजबिले आणि इतर शासकीय कागदपत्रे दिली. मात्र, नंतर SRA कार्यालयात या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती कथित बनावट असून शासकीय नोंदींशी जुळत नसल्याचं सांगण्यात आलं.
2024 मध्ये तक्रारदारांनी SRAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तपासादरम्यान सादर करण्यात आलेली कागदपत्रे खरी नसल्याचं कथितरीत्या समोर आलं. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यामध्ये शैलेश काकण, रूपेश वेलेंकर, अभिषेक गुजर आणि विश्वनाथ जाधव यांच्यासह अन्य काही जणांची मुख्य आरोपी म्हणून नावे नमूद करण्यात आली आहेत. फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली सर्वांनी संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, विश्वनाथ जाधव, जो यापूर्वी शिवसेना पक्षाच्या एका आमदाराचा वैयक्तिक सचिव होता आणि सध्या तो काँग्रेसच्या एका विद्यमान खासदाराचा वैयक्तिक सचिव म्हणून कार्यरत असल्याचं नमूद आहे, त्याने 25 लाख रुपयांच्या मोबदल्यात घर मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विश्वनाथ जाधव याच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची सत्यता आणि आरोपींची भूमिका यांचा सखोल तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा