Headlines

Mumbai Police Rescue Marathi Lead Actress Bollywood Actor in Girgaon Racket Crime News; गिरगावात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रंगेहाथ सापडला


Mumbai Girgaon Racket Bust : देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका झालेली प्रसिद्ध अभिनेत्री मराठी असून तिने अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत

Mumbai Girgaon Racket Marathi Actress Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गिरगावमधील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या देह व्यापाराच्या कथित रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटांमधील आघाडीची नायिका आहे, तर दुसरीने बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका (कॅमिओ) साकारल्या आहेत. या कारवाईदरम्यान एका दलालाला रंगेहाथ पकडण्यात आले. तो सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याचे सांगितले जाते. मुंबई पोलिसांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सुटका

“मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलवर छापा टाकून देह व्यापाराचा कथित अड्डा उद्ध्वस्त केला आणि दोन अभिनेत्रींची सुटका केली; यातील एक प्रसिद्ध अभिनेत्री मराठी असून तिने अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांत छोट्या भूमिकांसाठी ओळखली जाते. या कारवाईदरम्यान एका दलालला रंगेहाथ पकडण्यात आले” असे मुंबई पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या महिलांची ओळख उघड केलेली नाही.
Maharashtra TimesVaibhav Jadhav : व्हिडिओ कॉल करुन दाखव मला, केतनचा टॅक्सी चालकाला फोन; सिया-साहिलची भांडणं ते फूड मॉलवरील अजब प्रकार, वैभव जाधव काय म्हणाला?

मोठी रक्कम उकळली

पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांना देह व्यापार करण्यास भाग पाडले जात होते आणि ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळली जात होती. छापा टाकण्यापूर्वी या बेकायदेशीर कृत्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवले होते.

उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार

पोलीस अधिकारी या कथित नेटवर्कचा, तसेच देह व्यापाराला चालना देण्यात सहभागी असलेल्यांच्या भूमिकेचा तपास करत आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलीस आर्थिक व्यवहार, संवादाच्या नोंदी आणि मानवी तस्करीच्या एखाद्या मोठ्या रॅकेटशी असलेले संभाव्य दुवे यांची तपासणी करत आहेत. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
Maharashtra TimesSiya Goyal : महाबळेश्वरला केतनसोबत एकाच खोलीत राहावं लागणार, प्रसंग टाळण्यासाठी सियाने 18 जूनचाच प्लॅन रचला, तपासात धक्कादायक माहिती

याआधी तुर्भे नाक्यावर लॉजवरही छापा

याआधी, याच वर्षी जानेवारी महिन्यात, नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरातील एका लॉजमध्ये चालवले जाणारे अनैतिक देह व्यापाराचे रॅकेट ‘मानवी तस्करी विरोधी पथका’ने उघडकीस आणले होते. या पथकाने तेथून सात महिलांची सुटका केली. एका गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित तीन जणांना अटक केली होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा