Headlines

Mumbai News: पोलिसांच्या सतर्कतेने वृद्धेचा वाचला जीव; विक्रोळीतील 65 वर्षीय महिलेला जीवन संपवण्यापासून रोखले, काय प्रकरण? – mumbai police saved 65 yrs old woman life who tries to jump from fifth floor


Mumbai News: विक्रोळीत ६५ वर्षीय वृद्धेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. या महिलेला पोलिसांनी शिताफीने सुखरुप खाली उतरवले.

Anderson Phillip Catch - 2026-08-25T155306
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : विक्रोळीतील एका टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीत वृद्ध महिला गॅलरीच्या कठड्यावर चढत होती. इतक्यात टॉवरजवळून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नजर तिच्यावर पडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि पुढील काही मिनिटांत विक्रोळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्रसंगावधान राखत आणि वेगाने हालचाली करून पोलिसांनी महिलेला सुरक्षित घरात घेतले आणि एक लाखमोलाचा जीव वाचला.

ही घटना रविवारी सकाळी विक्रोळी परिसरात घडली. एका टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून एक ६५ वर्षीय महिला गॅलरीच्या कठड्यावरून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे पवई पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक पानसरे यांच्या निदर्शनास आले. त्या वेळी ते मॉर्निंग वॉकसाठी जात होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षातून लगेच विक्रोळी पोलिसांना कळविण्यात आले.

Maharashtra TimesMaharashtra Government: राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, आदिवासी मंत्री-आमदारांची तातडीची बैठक; विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मोठा निर्णयमाहिती मिळताच विक्रोळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गडदे, अंमलदार सुधाम बिन्नर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पानसरेही घटनास्थळी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी खालीून आवाज देत महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ती कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. काही क्षणांत परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात येताच पोलिसांनी वेळ न दवडता थेट पाचव्या मजल्यावरील तिचे घर गाठले.

घरातून गॅलरीत पोहोचलेल्या पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने आणि तत्परतेने महिलेला सुरक्षित आत घेतले. त्या वेळी घरात ती एकटीच होती आणि मानसिक तणावाखाली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तिला धीर दिला, आपुलकीने विचारपूस केली आणि तिचे समुपदेशन केले.

Maharashtra TimesBhuleshwar Cha Raja : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळावर ‘लालबागचा राजा’चं वडिलकीचं छत्र, नेवशे-जोशी कुटुंबीयांना मदतीचा हात, मंडळाला 11 लाखांचा निधीपोलिसांच्या तत्परतेमुळे आणि अचूक समन्वयामुळे एका महिलेचे प्राण वाचले. या प्रसंगावधानाबद्दल पानसरे, विक्रोळी पोलिसांचे पथक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांचे परिसरात कौतुक होत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा