Headlines

Mumbai News: कारवाईची ‘फेरी’ कायम; महापौरांच्या घाटकोपर वॉर्डमध्ये सहा महिन्यांत 4674 फेरीवाल्यांवर बडगा


Mumbai News: ‘एन’ वॉर्डपाठोपाठ सर्वाधिक कारवाई ‘पी दक्षिण’ वॉर्डमध्ये (गोरेगाव) झाली असून सहा महिन्यांत येथे चार हजार तीन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

mumbai
मुंबई फेरीवाले(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबईत पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर’ कोडचे वाटप सुरू असतानाच, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईही महापालिकेने कायम ठेवली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत मुंबई महापालिकेने ५५ हजार ८६१ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. यामध्ये मुंबईतील २४ वॉर्डपैकी महापौर रितू तावडे यांच्या ‘एन’ वॉर्डमध्ये (घाटकोपर-विद्याविहार) सर्वाधिक चार हजार ६७४ फेरीवाले कारवाईच्या जाळ्यात अडकले.

रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महापालिका नियमित कारवाई करत असली, तरी कारवाईनंतरही अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या कमी होत नसल्याने रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Maharashtra TimesFifa World Cup 2026: महाराष्ट्रातील रेस्टॉरंट पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; फुटबॉल वर्ल्डकपसाठी गृहविभागाचा निर्णय, कोणत्या अटी ठेवल्या?
केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले असले, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी मुंबईत अद्याप झालेली नाही. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १३ विभागांतील २० संवेदनशील ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर विशेष कारवाई सुरू करून ही ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये घाटकोपर पूर्व-पश्चिम रेल्वे स्थानक परिसराचा समावेश असलेल्या ‘एन’ वॉर्डचाही समावेश आहे. ‘एन’ विभागात सहा महिन्यांत ४ हजार ६७४ फेरीवाल्यांवर कारवाई करून सहा लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून ३३ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.

मुंबईभरातील कारवाईत महापालिकेने ५५ हजार ८६१ अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करून ७५ लाख १५ हजार २६० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच ६७८ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.

Uddhav Thackeray Shivsen UBT Protest | ठाकरेंच्या वाघिणीचं खणखणीत भाषण

कारवाई झालेल्या फेरीवाल्यांची संख्या
एन वॉर्ड (घाटकोपर-विद्याविहार) —४,६७४
पी दक्षिण (गोरेगाव) —४,००३
ए (कुलाबा, फोर्ट, नरीमन पॉइंट) —३,८६२
डी (ग्रॅण्ट रोड, मलबार हिल. गिरगाव) —३,२७२
जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, करी रोड) —३,४०७
आर मध्य (बोरिवली) —३,९३७
एकूण —५५,८६१

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा