Headlines

Mumbai local young man falls into water from running at midnight; मुंबई लोकलमधून तरुण थेट पाण्यात पडला, मध्यरात्री सुटकेचा थरार


Palghar News : नदीपात्रात पडलेल्या तरुणाला रात्रीच्या अंधारात बोटीच्या सहाय्याने वाचवण्यात आल्याची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

mumbai local
मुंबई लोकलमधून तरुण थेट पाण्यात पडला, मध्यरात्री सुटकेचा थरार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर: धावत्या लोकल ट्रेनमधून वैतरणा नदीपात्रात एक तरुण पडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान नदी पात्रात पडलेल्या या तरुणाला स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत केली आणि नदीपात्रातून तरुणाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर येथील उद्यन वांगड हा तरुण पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू लोकल ट्रेनमधून प्रवास करत होता. पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या वैतरणा नदी नदीवरील पुलावरून लोकल ट्रेन जात असताना हा तरुण थेट वैतरणा नदी पात्रात पडला. मंगळवारी रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

तरुण धावत्या लोकल ट्रेनमधून नदीपात्रात पडल्यामुळे एकच खळबळ उडाली. नदीपात्रात तरुण पडला असल्याची बाब रेल्वे कर्मचारी रमेश सिंग यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने वाढीव येथील गुरु पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती देऊन त्यांना मदतीसाठी पाचारण केले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता गुरु पाटील, साई पाटील यांच्यासह इतर सहकारी स्वतःची बोट घेऊन वैतरणा नदीपात्रात गेले. नदी पात्रात पडलेला उद्यन याने नदीपात्रात पडल्यानंतर रेल्वे पुलाच्या एका खांबाचा आधार घेतला होता. तातडीने बोटीच्या सहाय्याने तेथे जाऊन नदीपात्रात पडलेल्या उद्यन याला पाण्यातून बाहेर काढून बोटीवर घेण्यात आले. बोट नदीकिनारी आल्यानंतर उद्यन याला रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले.

दरम्यान, स्थानिकांच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्परतेमुळे नदीपात्रात पडलेल्या उद्यन वांगड या तरुणाला वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. स्थानिकांच्या धाडसी वृत्ती आणि मानवतेच्या भावनेतून केलेल्या मदतकार्याचे स्तरातून कौतुक होत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा