Headlines

Mumbai Local Update: विकेंडला मुंबईकरांचे हाल! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक – mumbai local train update central harbour railway megablock on 23 august 2026


मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा ब्लॉक नसेल. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने धावतील.

मध्य रेल्वे

सीएसएमटी- विद्याविहार,

मार्ग : अप आणि डाउन धीमा

वेळ : स. १०.५५ ते दु. ३.५५

परिणाम : अप, डाउन धीम्या लोकल जलद मार्गावर धावतील.

हार्बर रेल्वे

कुर्ला ते वाशी

मार्ग : अप आणि डाउन

वेळ : स. ११.१० ते सायं. ४.१०

परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप, डाउन लोकल रद्द.

पश्चिम रेल्वे

स्थानक : बोरिवली ते भाईंदर

मार्ग : अप आणि डाउन धीमा

वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.३० ते रविवारी पहाटे ४.३०

परिणाम : विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव लोकल अप, डाउन जलद मार्गावरून. काही फेऱ्या रद्द.

मेगाब्लॉक नको, मेट्रो फेऱ्या वाढवा- मंत्री मंगलप्रभात लोढा

गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेऊ नयेत तसेच मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवाव्यात, असे निर्देश मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. गणेशोत्सवात मुंबईसह उपनगरांतील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मेट्रो आणि लोकलचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर अर्थात ‘हेडवे’ कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळेत मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवून भाविकांसाठी विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही सांगण्यात आले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत