Headlines

Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, हार्बर-पश्चिम मार्गांवर काय स्थिती? पाहा वेळापत्रक


Mumbai Local Mega Block On 2 August 2026: ब्लॉकवेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. काही विलंबाने धावणार आहेत.

mumbai local mega block.
मुंबई लोकल ट्रेन मेगाब्लॉक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंंबई : माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे
स्थानक – माटुंगा ते मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – स. ११.०५ ते दु. ३.४५
परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

Maharashtra TimesWestern Railway: स्टेशन मास्तरांवर श्वानांचीही जबाबदारी! सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती
हार्बर रेल्वे
स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – स. ११.४० ते दु. ४.४०
परिणाम – सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला फलाट ८वरून २० मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे
स्थानक – मुंबई सेंट्रल ते माहीम
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.२५ ते रविवारी पहाटे ४.२५
परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
Maharashtra TimesCabinet Meetings: मंत्रिबैठकीचा ‘महाराजा’ थाट! एअर इंडिया इमारतीत लवकरच मंत्र्यांची दालने हलवणार, 22व्या मजल्यावर होणार मसलती
अंबरनाथ ‘रेलनीर’ची झेप

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) पश्चिम विभागातील अंबरनाथ येथील रेलनीर प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दररोज १ लाख ७४ हजार बाटल्यांचे उत्पादन करणारा हा प्रकल्प आधुनिकीकरणानंतर प्रतिदिन तीन लाख बाटल्यांचे उत्पादन करू शकणार आहे. येथील अतिरिक्त आनंदनगर एमआयडीसी येथे २०१४मध्ये सुरू झालेला अंबरनाथ रेलनीर प्रकल्प सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आला असून, रेल्वेच्या पश्चिम विभागातील सर्वात मोठा शुद्ध पाणी प्रकल्प म्हणून त्याची ओळख आहे. प्रकल्पाशेजारी असलेल्या जीआयपी धरणातील पाण्याचा वापर करणारा आयआरसीटीसीचा हा एकमेव रेलनीर प्रकल्प आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा