Headlines

Mumbai Local Crime: मुंबई लोकलमध्ये नक्की काय चाललंय? आधी तरुणाला संपवलं, आता Sorry बोलल्यानंतरही एकाला चाकूने भोसकलं


Mumbai Railway Station Knife Attack: चुकून धक्का लागला, सॉरीही बोललं तरीही ३५ वर्षीय तरुणाला भोसकले. माहीम रेल्वे स्थानकावरील भयंकर घटना. परिसरात खळबळ

mahim junction
mahim junction(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : चर्चगेट-नालासोपारा लोकलमधील खुनाची घटना ताजी असतानाच माहीम स्थानक परिसरात ‘सॉरी’ म्हटल्यानंतरही एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याचे समोर आले आहे. स्थानक परिसरात चालताना तरुणाचा एका व्यक्तीला धक्का लागून त्याचा मोबाइल खाली पडला. त्या रागातून संबंधित व्यक्तीने तरुणावर चाकूने वार केले. जखमी तरुणावर शीव रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहीम पश्चिम येथील पीतांबर लेनमधील कुरेशी महल कंपाऊंडमध्ये राहणारे नवीन प्रसन्न (३५) हे लोअर परळ येथील खासगी कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करतात. गुरुवारी, २५ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्यासाठी त्यांनी लोअर परळहून धीमी लोकल पकडली आणि माहीम स्थानकात उतरले. स्थानक परिसरात चालत असताना त्यांचा धक्का एका अनोळखी व्यक्तीला लागला. त्यामुळे त्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल खाली पडला.

Maharashtra TimesRaj Thackeray On Vishwas Nagare Patil: पोलिसांनी पक्ष, संघटनांपुढे बुद्धी गहाण ठेवू नये! राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका
नवीन यांनी त्वरित त्या व्यक्तीला ‘सॉरी’ म्हटले आणि चुकून धक्का लागल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने मोबाइल उचलून तपासला असता मोबाइलचे कोणतेही नुकसान झाले नव्हते. तरीही त्या व्यक्तीने वाद घालत शिवीगाळ केली. वाद टाळण्यासाठी प्रसन्न तिथून निघून गेले.

Maharashtra TimesMumbai Crime : मुंबईत घातपात घडवण्याचा होता मोठा डाव? मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्यांचे वाटप, 14 हजार गोळ्या जप्त
तथापि सेनापती बापट मार्गापर्यंत पाठलाग करत आरोपीने नवीन यांच्यावर चाकूने वार केले. जखमी नवीन यांनी मदतीसाठी नागरिकांना आवाज दिला, मात्र आरोपीने चाकू दाखवत इतरांना घाबरवले. त्यामुळे परिसरात एकच दहशत पसरली आणि गोंधळ निर्माण झाला. याचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत घरी पोहोचलेल्या नवीन यांना त्यांच्या भावाने तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा