Ganeshotsava 2026 : माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम सुरू असले तरी माणगावमधील रेल्वेपूल आणि नदीपुलाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर उजाडणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते गणेशोत्सवापूर्वी बुजवून गणेशभक्तांचा मार्ग सुकर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले आहेत
मुंबई गोवा हायवे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बाह्यवळण मार्गाचे काम यंदाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार नाही. त्यासाठी डिसेंबर उजाडणार असल्याने यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. परंतु, या मार्गावरील लांजा, कोलेटी, संगमेश्वर आणि निवळी येथील उड्डाणपुलांचे काम गणेशोत्सवाआधी मार्गी लागणार असल्याने कोकणवासीयांना थोडा दिलासा मिळणार आहे.
बायपासचे काम गणेशोत्सवापूर्वी अशक्य
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीसंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी माणगाव आणि इंदापूर बाह्यवळण मार्गाचे (बायपास) काम गणेशोत्सवाआधी पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
संगमेश्वरच्या हायवेचं काम जोरदार
संगमेश्वर येथे महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून, ते गणेशोत्सवाआधी पूर्ण होणार आहे. पावसामुळे कामात अडथळा येत असला तरी ते पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे खेड येथे खचलेल्या भागाचीही दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय भोस्ते घाटाचे कामही वेगाने मार्गी लावले जात आहे.
महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते खड्डे गणपतीपूर्वी बुजवून गणेशभक्तांचा मार्ग सुकर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिले आहेत. माणगाव आणि इंदापूरमधील बाह्यवळणाचे काम सुरू असले तरी माणगावमधील रेल्वेपूल आणि नदीपुलाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर उजाडणार आहे. मात्र, इंदापूर बाह्यवळण मार्गावरील एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न असून, तसे झाल्यास निदान इंदापूरमधील वाहतूक कोंडी काही प्रमाणात टळणार आहे.
जाळीचा देव रस्त्याला मंजुरी द्या
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथील जाळीचा देव-सावळदबारा रस्त्याला वनविभागातून परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी केली आहे. नुकतीच मुलतानी यांनी वनमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली.
सिल्लोड- सोयगाव तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जाळीच्या देव- सावळदबारा या महत्त्वाच्या रस्त्याच्या वन विभागाच्या परवानगीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुलतानी यांनी वनमंत्र्यांची भेट घेतली. हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असून, आवश्यक परवानगीअभावी अनेक वर्षांपासून रखडला होता. परिसरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले.
Satish Naikodi : वय वर्ष 50, काय उरलं आयुष्यात, परत कसं उभं राहायचं? क्राईम पेट्रोल फेम मराठी अभिनेत्याची फसवणूक, व्हिडिओत उद्विग्न सवालया मागणीची गांभीर्याने दखल घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित प्रादेशिक वन अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली; तसेच जिल्हा मुख्य वनसंरक्षक यांना प्रस्तावाला गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले, असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सोबतच पोखरा योजनेतील रखडलेले अनुदान तात्काळ वितरण करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. या मागणीलादेखील मीनल करणवाल यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. या वेळी भाजप जिल्हा सचिव सुनील गावंडे, ईश्वर क्षीरसागर, संभाजी पवार उपस्थित होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा